गुवाहाटी : आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. एअरबेसवर लँडिंग करत असताना हवाई दलाचं AN-32 कार्गो विमान क्रॅश झालं. या घटनेत विमानाचे दोन तुकडे आहेत. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण आलं. या घटनेत या विमानातील को पायलट बचावले आहेत मात्र त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भारतीय हवाई दलाकडून तातडीनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण
स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह
फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार
सार्जेंट जितेंद्र शर्मा
अग्निवीर वायू खेमाराम कुमावत
अग्निवीर वायू दानिश आलम
भारतीय हवाई दलानं प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात या दुर्घटनेत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगात भारतीय हवाई दल तुमच्या कुटुंबासोबत उभ असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
भारतीय हवाई दलानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी सुरु केली आहे. ही दुर्घटना कोणत्या कारणामुळं झाली याची चौकशी करण्यात येईल. जोरहाट एअरबेस जवळ विमान कशामुळं क्रॅश झालं. तांत्रिक समस्या निर्माण झाली की इंजिन फेल झालं याची चौकशी केली जाईल. याशिवाय खराब हवामानामुळं हा अपघात घडला असावा का या बाजूनं देखील चौकशी केली जाईल. भारतीय हवाई दलानं कोर्ट ऑफ इनक्वायरीचे आदेश दिले आहेत. या अपघातात को पायलट बचावला असून या चौकशीत त्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण तो अपघातावेळी कॉकपिटमध्ये होता.
भारतीय हवाई दलात AN-32 विमान गेल्या चार दशकांपासून महत्त्वाची भूमिका पार पाडतंय. कारगील युद्धापासून बचावकार्य राबवण्यामध्ये या विमानाची महत्त्वाची भूमिका होता. यापूर्वी देखील हे विमान क्रॅश झालं आहे.भारताच्या गरजा लक्षात घेऊन रशियाकडून एंतोनोव डिझाईन ब्यूरोकडून तयार करण्यात आलं आहे. ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेशातील पर्वतीय आणि दुर्गम भागापासून ते सियाचीन आणि लडाखच्या दुर्गम भागात भारतीय सैन्याला रसद पोहोचवण्यात या विमानानं महत्त्वाची भूमिका बचावली आहेत. भारतीय हवाई दलात AN-32 विमान 1984 मध्ये दाखल झोलं होतं.
The Indian Air Force deeply regrets the loss of five personnel in the An-32 accident at Jorhat, Assam.
Sqn Ldr Prashant Singh, Flt Lt Shubham Kumar, Sgt Jitendra Sharma, Agniveervayu Khemaram Kumawat and Agniveervayu Danish Alam made the supreme sacrifice in the line of duty.… pic.twitter.com/9SmOjtS5mU
— Indian Air Force (@IAF_MCC) June 13, 2026
भारतीय हवाई दलासाठी सुरुवातीला AN32 या मॉडेलची 118 ते 123 विमानं खरेदी केली होती. त्यापैकी 110 विमानं सध्या कार्यरत आहेत. काही विमानांना AN-32RE मॉडेलमध्ये अपडेट करण्यात आलं आहे.
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!