Last Updated:
महिला टी-20 वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरूवात झाली आहे. टीम इंडिया त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध रविवारी खेळणार आहे.
मुंबई : महिला टी-20 वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरूवात झाली आहे. टीम इंडिया त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ग्रुप ए चा हा महामुकाबला रविवार 14 जून रोजी होईल. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आपला 10वा टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडिया यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मध्ये आहे. भारतासोबत या ग्रुपमध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स या टीम आहेत.
टी-20 मध्ये भारत-पाकिस्तान रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 16 महिला टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या आहेत, ज्यात भारताचा 13 आणि पाकिस्तानचा फक्त 3 सामन्यांमध्ये विजय झाला आहे. हे रेकॉर्ड पाहता भारतीय महिला टीमचं पारडं जड दिसत आहे.
भारत-पाकिस्तान मॅच कधी होणार?
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना रविवार 14 जून 2026 रोजी होणार आहे.
कोणत्या मैदानात होणार सामना?
भारत-पाकिस्तान यांच्यातला टी-20 सामना बर्मिंघमच्या एजबॅस्टनमध्ये होईल.
किती वाजता सुरू होईल भारत-पाकिस्तान मॅच?
महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना रविवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
कुठे पाहता येईल सामना?
भारत-पाकिस्तान यांच्यातला टी-20 वर्ल्ड कपचा हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्य चॅनलवर पाहता येणार आहे, तर मॅचचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग जियोहॉटस्टारवर दिसेल.
भारतीय महिला टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड, नंदिनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, राधा यादव, अरुंधती रेड्डी
Mumbai,Maharashtra
