Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?


Shani Vakri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. जेव्हा पण शनिदेव आपल्या चालीत बदल करतात, किंवा राशी परिवर्तन, मार्गीपासून वक्री होताता तेव्हा त्याचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होतो. द्रिक पंचांगानुसार, शनिदेव येत्या 27 जुलै 2026 रोजी उलटी चाल म्हणजेच वक्री होणार आहे. तर, 11 डिसेंबर 2026 पर्यंत तो याच अवस्थेत असणार आहे. 

सध्या मेष, मीन आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती सुरु आहे. अनेकदा शनिची वक्री चाल कष्टायची मानली जाते. मात्र, यंदाची ही चाल दोन राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीत शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. शनिची वक्री चाल या राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणाव, कामातील अडथळे हळुहळू दूर होतील. जर तुमचे पैसे रखडले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा कालावधी सगळ्यात कष्टाचा मानला जातो. मात्र, शनिच्या वक्री अवस्थेचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. त्यामुळे या राशीच्या लोकांनी काळजी करण्याची गरज नाही. एखाद्या दिर्घकालीन आजारापासून तुमची सुटका होऊ शकते. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. 

शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी ‘हे’ करा अचूक उपाय

  • शनिवारच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावावा. 
  • शनिवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे. यामध्ये काळी उडीद डाळ, काळे तीळ, काळ्या रंगाचे कपडे दान करावेत. 
  • हनुमान चालीसाचं पठण करावं. शनिदेवाला भगवान हनुमानजी फार प्रिय आहेत. त्यामुळे शनिवारी-मंगळवारी नियमितपणे हनुमान चालिसाचं पठण करावं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :                                                                             

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु. मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचा तिसरा आठवडा गेमचेंजर; कोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *