Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता…; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z


India A VS Sri Lanka A Live Streaming Vaibhav Sooryavanshi : भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेत असलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा आपल्याकडे खेचत आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने आयपीएलमध्ये केलेल्या विस्फोटक फलंदाजीमुळे तो फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय झाला आहे. आता त्याची निवड भारताच्या टी-20 संघात आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी झाल्याने त्याची चर्चा आणखी वाढली आहे. सध्या वैभव श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा अ मालिकेत इंडिया अ संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ हे तीन संघ सहभागी झाले आहेत. आतापर्यंत वैभवने दोन सामने खेळले असून त्याच्या पुढील सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

वैभव सूर्यवंशीचा पुढचा सामना कधी अन् कोणाविरुद्ध खेळणार? (Vaibhav Sooryavanshi News)

वैभव सूर्यवंशीचा पुढील सामना सोमवार, 15 जून 2026 रोजी होणार आहे. इंडिया अ संघाकडून तो पुन्हा एकदा मैदानात उतरून आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवण्याचा प्रयत्न करेल. जो श्रीलंका अ संघाविरुद्ध होणार आहे. यापूर्वीही त्याने या स्पर्धेत श्रीलंका अ विरुद्ध खेळले होते. आता त्याच संघाविरुद्ध दुसऱ्यांदा खेळताना मोठी खेळी करण्याची संधी त्याच्याकडे असेल.

सामना किती वाजता सुरू अन् सामना कुठे खेळवला जाणार?

हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना दिवसाची सुरुवात वैभवच्या फलंदाजीने पाहण्याची संधी मिळणार आहे. वैभव सूर्यवंशीचा हा सामना श्रीलंकेतील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. फलंदाजांसाठी तुलनेने अनुकूल मानल्या जाणाऱ्या या मैदानावर वैभवकडून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते.

या तिंरगा मालिकेतील कामगिरी

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत श्रीलंका तिंरगा ‘अ’ सिरीज 2026 मध्ये फक्त दोन सामने खेळले आहेत. स्पर्धेतील श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात, त्याने 116.67 च्या स्ट्राईक रेटने 12 चेंडूंमध्ये तीन चौकारांसह 14 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने नऊ चौकारांसह 22 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. त्याने आतापर्यंत 56 धावा केल्या आहेत. आता, मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मोठी खेळी करून मोठा प्रभाव पाडण्याची त्याला संधी मिळेल.

वैभव सूर्यवंशीची आयपीएलमधील कामगिरी

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत आयपीएलच्या दोन हंगामांमध्ये भाग घेतला आहे. त्याने 2025 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले. त्या हंगामात त्याने सात सामन्यांमध्ये 252 धावा केल्या. पदार्पणाच्या हंगामात त्याने 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले. आयपीएल 2026 मध्ये, त्याने 16 सामन्यांमध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांसह 776 धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये 81 चौकार आणि 96 षटकारांसह एकूण 1028 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची ‘धो-धो’ बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *