महिनाभर प्लानिंग, लोकेशन ट्रेस… भावालाच दिली सुपारी… पण एका चुकीमुळे शातिर बायकोचा कट उघड – Marathi News | Karad Murder Case Wife Brother Accused of Plotting Engineers Murder and Staging It as Accident


दिवसेंदिवस गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहे. एका विवाहितेने पत्नीचा काटा काढण्यासाठी महिनाभर आधी प्लानिंग केले. त्याच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवले. त्यानंतर भावाच्या मदतीने पतीचा जीव घेतला. मात्र, एका चुकीमुळे शातिर बायकोचा हा कट उघड झाला. तिने मृदू व जलसंधारण विभागात अभियंता असलेल्याल पतीची पहाटे कारने उडवून हत्या केली. मात्र, 12 तासाच्या आत कराड शहर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असून हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले आहे. या घातपातात पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभियंता लक्ष्मण मंडले हे कराड तालुक्यातील मनव गावचे असून त्यांनी महाबळेश्वर कराड येथे काम केले आहे.

नेमकं काय घडलं?

कराडमध्ये पहाटे घडलेल्या एका कथित अपघातामागे खुनाचा कट असल्याचे उघडकीस आले. पहाटे 5.53 वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर एका व्यक्तीचा अपघात झाल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाला मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले हे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने मृत व्यक्ती आपले पती असल्याचे सांगितले. मात्र तिच्या हालचाली व माहितीतील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली.

सीसीटीव्हीमुळे सत्य समोर

सीसीटीव्हीमध्ये लक्ष्मण मंडले हे कमल हॉस्पिटलसमोरून पायी जात असताना एका अल्टो कारने त्यांना मागून जोरदार धडक दिल्याचे दिसून आले. त्यानंतर आरोपींनी गाडी पुढे-मागे करून त्यांना चिरडले, त्यांच्याजवळील बॅग व साहित्य घेऊन पळ काढला. एवढ्यावरच न थांबता काही वेळाने पुन्हा घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासादरम्यान लक्ष्मण मंडले हे शहापूर (जि. ठाणे) येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. कौटुंबिक वादातून पत्नी सुरेखा मंडले (वय 36) हिने तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण (वय 40) याच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सुमारे महिनाभरापासून नियोजन करून दोघांनी ओळखीच्या व्यक्तींना सुपारी दिली. पतीचे लोकेशन देऊन अपघाताचा बनाव रचत ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सुरेखा मंडले व संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. कराड शहर पोलीस ठाण्याची तीन पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *