Baramati Fire News : बारामती शहरात धक्कादायक घटना घडली आहे. विश्वास नगर परिसरात असलेल्या देवराज रेसिडेन्सीमध्ये पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बॅटरीमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळं शेजारी उभ्या असलेल्या इतर वाहनांनाही आग लागली. या आगीत एकूण चार दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर एका चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. तसेच बारामती नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. अग्निशामक दल आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून विद्युत प्रवाह बंद केला आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करताना आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग, घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक
बीडच्या माजलगावात असलेल्या पाटील गल्ली येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळं या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.आज सकाळी सुमारे 11 च्या दरम्यान संदीपान होके यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत तिने घरातील बहुतांश घर आगीच्या भक्षस्थानी सापडले.या आगीमध्ये घरातील दागिने, फ्रिज,कुलर,टीव्ही,कपाट,अन्नधा
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल