तुम्हाला खूप जास्त घाम येतो का? जाणून घ्या या मागचं कारण – Marathi News | Do you sweat a lot Find out the reason behind this


तुम्हाला खूप जास्त घाम येतो का? जाणून घ्या या मागचं कारणImage Credit source: TV9 Network/Hindi

शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यासाठी प्रत्येकाला घाम येतो आणि ही सामन्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात उकाड्याने, शारीरिक हालचाल आणि तणावपूर्ण स्थितीत घाम येतो. प्रत्येकाचा हा रोजचा अनुभव आहे आणि यात काही नवीन नाही. पण काही लोकांना कोणतंही शारीरिक श्रम न करता आणि सामन्य स्थितीतही घाम येतो. काही लोकांना तळहात, तळपाय, चेहरा किंवा संपूर्ण शरीराला घाम सुटतो. जास्त घाम येणं ही काय चांगली बाब मानली जात नाही. त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन जीवन आणि कामावर परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वासही खालावू शकतो. त्यामुळे घाम येण्याची मूळ कारणं समजून घेणं आवश्यक आहे. जास्त घाम येणं ही फक्त हवामान किंवा शारीरिक हालचालीशी निगडीत आहे की पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे किंवा आरोग्याच्या इतर समस्यांमुळे असू शकते. त्यामुळे काही कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

जास्त घाम येण्याची कारणं कोणती?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, शरीराच्या तापमानाची स्थिती नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त घाम येतो. संशोधकांच्या मते, काही प्रकरणांमध्ये ही सहज घडणारी समस्या आहे. थायरॉइडच्या समस्या, मधुमेह, संसर्ग, हार्मोनल बदल, लठ्ठपणा किंवा मज्जासंस्थेच्या समस्यांशी निगडीत असू शकते. काही प्रकरणात विशिष्ट औषधही याला कारणीभूत ठरू शकतात. जास्त घाम येणाऱ्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम पातळी कमी असू शकते.

…तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

जास्त घाम येत असेल आणि वजन कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या स्थितीत थकवा जाणवतो, हृदयाचे ठोके वाढतात, चक्कर येते, ताप येतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो, अशा स्थितीत डॉक्टरांकडे जाणं आणि त्याचा सल्ला घेणं योग्य ठरेल. काही कारण नसताना घाम येत असेल आणि जास्त काळ टिकत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

अति घाम येणं कसं टाळाल?

शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. हलके आणि आरामदायक कपडे घाला. उष्ण वातावरणात जास्त वेळ राहणं टाळा. तसेच शरीराला पोषक तत्वे मिळतात का याची खात्री करून घ्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *