TRAI: ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश, Calling आणि SMS Only रिचार्ज प्लान बंधनकारक, इंटरनेट नको असणाऱ्यांना दिलासा    


नवी दिल्ली: मोबाईलधारकांना सिमकार्ड रिचार्ज करताना इंटरनेट पॅक नको असला तरी इंटरनेटचा समावेश असणारा प्लान घ्यावा लागत होता. मात्र, ज्यांचा फोनचा वापर फक्त कॉल करणे, फोन घेणे आणि एसएमएस करणे इतकाच मर्यादित असतो त्यांना ट्रायच्या एका निर्णयानं दिलासा मिळणार आहे. ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग आणि एसएमएसचा पर्याय असणारे रिचार्ज प्लान उपलब्ध करण्यास सांगितलं आहे. म्हणजेच ज्यांना इंटरनेट डेटाची आवश्यकता नाही त्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे.  

 TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना Voice आणि SMS सुविधा असणारे रिचार्ज प्लान उपलब्ध करणं बंधनकारक केलं आहे. यामुळं ज्या यूजर्सना डेटाची आवश्यकत नाही ते फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे प्लान निवडू शकतात. नव्या नियमानुसार कंपन्यांना 30 दिवसांचे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची वैधता असणारे Voice आणि SMS Only प्लान उपलब्ध करुन द्यावे लागतील.  

कॅलेंडर महिन्याच्या हिशोबानं पर्याय मिळणार  

TRAI ने  रिचार्जच्या वैधतेनुसार एक व्यवस्था लागू केली आहे. कपन्यांना कॅलेंडर महिन्याच्या आधारावर चालणारे प्लॅन देखील द्यावे लागतील. यामुळं एखाद्या ग्राहकानं  एखाद्या महिन्यात 5 तारखेला रिचार्ज केला तर त्याला पुढील महिन्यात 5 तारखेलाच रिचार्ज करावा लागेल.  

कमी कालावधीचे वैधता असणारे No-Data Plan आवश्यक

ट्रायच्या निर्णयानुसार फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठीचे प्लान कमी कालावधीच्या वैधतेसाठी नव्हे तर दीर्घ कालावधीसाठी वैधता असणारे प्लान आणावे लागतील. सध्या काही कंपन्या 84 दिवस आणि 365 दिवसांचे प्लान देतात. यामध्ये एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करावी लागते. यामुळं कमी कालावधीचे डेटा नसणारे प्लान आवश्यक आहेत. या प्रकरणी एप्रिल 2026 मध्ये ट्रायनं कंपन्या आणि ग्राहकांकडून सूचना मागवल्या होत्या. ज्यामध्ये ट्रायकडे 1132 सूचना मिळाल्या होत्या. जून 2026 मधील चर्चेनंतर हे नियम लागू करण्यात आलेत.  

कोणत्या यूजर्सला होणार फायदा?

ट्रायनं घेतलेल्या नव्या निर्णयाचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो. फीचर फोन वापरणारे यूजर्स ज्यांना इंटरनेट डेटाची आवश्यकता नसते त्यांना होईल. याशिवाय जे यूजर्स दोन सिम कार्ड वापरतात त्यांना देखील याचा फायदा होईल. कारण त्यांना ते सिमकार्ड कॉलिंग आणि बँकेच्या ओटीपीसाठी सुरु ठेवावं लागतं. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *