दिशा सालियान प्रकरणात भाजपाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, संजय राऊत यांचीच.. – Marathi News | Rasad Lad leveled serious allegations against Sanjay Raut in the Disha Salian case


दिशा सालियान प्रकरण गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. कोर्टाने दिशा सालियान प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे दिला. सीबीआयकडून या प्रकरणाची चाैकशी केली जात आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबानंतर सीबीआयने या प्रकरणात एफआयआर दाखल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी ते मातोश्रीवर पोहोचले. मातोश्रीच्या गेटवर आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी दिशा सालियान हिच्या वडिलांची नोटीस स्वीकारली.  सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. 500 कोटींच्या भरपाईची मागणी त्यांनी केली. लेकीला न्याय मिळावा याकरिता दिशाचे वडील सतत पाठपुरवठा करत आहेत.

दिशा सालियान प्रकरणावर आता भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी मोठे भाष्य केले. प्रसाद लाड यांनी म्हटले की, दिशा सालियान प्रकरण हे मुंबई हायकोर्टाने सीबीआयकडे वर्ग केले. त्याच्यामध्ये ज्या ज्या आरोपींची त्यांची नावे आहेत, त्याची चाैकशी करून त्याचा अहवाल देण्यास सांगितले.

त्याच्यामुळे त्यात फार काही उवापाव करण्याची खरं तर गरज नाही. मला तर असे वाटते की, संजय राऊत यांचीच इच्छा आहे की, दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना त्रास व्हावा. माझ्या मनामध्ये एक शंका आहे. कारण खाजून खरूज काढण्याचे काम संजय राऊत करतात. सातत्याने रोज सकाळी उठले की, दिशा सालियान… दिशा सालियान करतात.

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर बोलून कोणाला तरी डिवचून मग त्याकडून पुन्हा डिवचलं जाण्याची वाट पाहत असतात. ही शंका आमच्या मनात आहे. मला वाटते की, त्याच्या मालकाने भुंकणाराला थोडे शांत केले तर दिशा सालियान प्रकरण शांत होईल. पण संजय राऊत जे भुंकत राहतात, त्यामुळे हे प्रकरण अधिक बाहेर येत राहते, असा मला संशय आहे. यादरम्यान जरांगे पाटलांबद्दलही बोलतानाही प्रसाद लाड दिसले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *