IND vs AFG 1st T20 : सामन्याच्या 48 तास आधी टीम इंडियाला धडकी; इशान किशनला दुखापत, गौतम गंभीर उभा राहून पाहत राहिला, नेमकं काय घडलं?


Ishan Kishan IND vs AFG 1st T20 : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेला सुरुवात होण्याच्या अवघ्या 48 तास आधी टीम इंडियाच्या गोटातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन सरावादरम्यान अचानक अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करताना इशानला पाठीत अचानक ताण जाणवला आणि त्याला आपला सराव मध्येच थांबवावा लागला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13, 15 आणि 17 सप्टेंबर रोजी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघाने अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. जवळपास सर्वच खेळाडू सराव करताना दिसले. मात्र, सरावादरम्यान इशान किशनसोबत घडलेल्या घटनेने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे.

नेमकं काय घडलं?

दिल्लीतील सराव सत्रात इशान सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाजात दिसत होता. त्याने जवळपास प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. रेंज हिटिंगवरही त्याने विशेष भर दिला. त्याची फलंदाजी पाहता तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं चित्र होतं. पण सरावादरम्यान अचानक परिस्थिती बदलली. टीम इंडियाच्या नेट्समध्ये नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. यावेळी सैनीने टाकलेल्या एका शॉर्ट-पिच चेंडूवर ईशानने डक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी त्याच्या पाठीत अचानक क्रॅम्प किंवा ताण आल्यासारखं दिसलं. इशान लगेचच अस्वस्थ झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर भारतीय संघाचा फिजिओ तातडीने त्याच्याजवळ पोहोचला आणि त्याची तपासणी केली. मात्र, इशानने त्यानंतर पुन्हा फलंदाजी सुरू न करण्याचा निर्णय घेतला.

पाठ आणि कंबरेवर हात ठेवत नेट्समधून बाहेर

इशान बराच वेळ आपल्या पाठ आणि कंबरेच्या भागावर हात ठेवताना दिसला. त्यानंतर बॅट आणि पॅडसह तो नेट्समधून बाहेर आला आणि त्याने सराव थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, इशानच्या दुखापतीचं गांभीर्य किती आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळणार की नाही, हे सध्या स्पष्ट झालेलं नाही.

दुलीप ट्रॉफीतील 270 धावांनंतर इशान फॉर्मात

इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने 270 धावांची तुफानी खेळी केली. या कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला आहे. दिल्लीतील नेट्समध्येही त्याची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. व्हाइट बॉल क्रिकेटसाठी तो स्वतःला तयार करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. मात्र, नवदीप सैनीच्या एका बाऊन्सरनंतर संपूर्ण चित्रच बदललं.

हे ही वाचा –

Mohammed Siraj News : 140 धावा दिल्या, विकेट एकही नाही… अन् काही दिवसांतच पुन्हा नशीब पालटलं! मोहम्मद सिराज झाला कर्णधार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *