Horoscope Today 10 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 10 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज पोळ्याचा सण, पिठोरी अमावस्या आणि श्रावण मासातील शेवटचा गुरूवार आहे. हा दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीमध्ये इतरांची मदत घ्यावीशी वाटेल, तरुणांच्या प्रेम प्रकरणांमध्ये गैरसमज आणि दिशाभूल होण्याची शक्यता
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील सदस्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तरी त्यामध्ये यश मिळणार नाही
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शब्द हे शस्त्र आहे हे आज लक्षात ठेवावे लागेल. इतरांच्या कलाकलाने वागून आपली कामे मोठ्या युक्तीने करून घ्याल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील तरुण वर्गाचे वागणे तुम्हाला उथळ वाटेल. त्यांना शिकवायला जाल, पण तुटेपर्यंत आणू नका.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काम करायला उत्साह राहणार नाही. नको त्या ठिकाणी काम करावे लागल्यामुळे कामाची टाळाटाळ ही केली जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात वाद संभवतात. कोणतेही आर्थिक निर्णय अचानक आणि पटकन घेऊ नयेत
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात कोणावरही लगेच विश्वास टाकू नये, आपल्या कामांमध्ये जास्तीत जास्त शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मोजके बोलून आपली कामे करून घ्या, नवीन घराच्या खरेदीचे बेत थोडे पुढे ढकलावे लागतील
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्येष्ठांना निद्रानशाचा विकार जडण्याची शक्यता आहे, इस्टेटीबाबत कामे पुढे जातील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन नोकरी व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, तुमच्या गुणवत्तेला सतत सुधारणा करण्याचे वेड लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नव्या वाटा साद घालतील, योग्य त्या व्यक्तींशी संपर्कात राहावे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्त पैसा गुंतवावा लागेल, मुलांसाठी आर्थिक नुकसान सहन कराल.
हेही वाचा :
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका! सोंडेच्या दिशेबद्दल तर कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)