Miss World 2026 : व्हिएतनाममध्ये 73 वी मिस वर्ल्ड 2026 स्पर्धा पार पडली. आज (5 सप्टेंबर) मिस वर्ल्डचा महाअंतिम सोहळा पार पडला. या स्पर्धेत सुमारे 111 देशांनी भाग घेतला होता. यामधून डोमिनिकन रिपब्लिकची जोहेरी मोला डोमिंग्वेझने मिस वर्ल्ड 2026 चा किताब पटकावला आहे. तर निकिता पोरवालने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिला मात्र टॉप 20 मध्ये देखील स्थान मिळवता आलं नाही. ती स्पर्धेतून लवकरच पडली.
डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोला डोमिंग्वेझने 73 व्या मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तिने स्पेनच्या एलिझाबेथ रेनेस (प्रथम उपविजेती) आणि मलेशियाच्या तानुसिया चेट्टी (द्वितीय उपविजेती) यांचा पराभव केला. तिला विजेतेपदाचा मुकुट ओपल सुचाता चुआंगसरी (थायलंड) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ओपल ही गेल्या वर्षी झालेल्या 72 व्या स्पर्धेची विजेती होती आणि आपल्या देशातून हा किताब जिंकणारी ती पहिलीच स्पर्धक होती.