Hindu Religion: पूजेमध्ये ‘पंचामृताला’ मोठे महत्त्व का आहे? ते प्रसाद म्हणून का दिले जाते? पंचामृत अमृतासमान पवित्र का मानतात? महत्त्व कमी लोकांना माहित..


Hindu Religion: हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, अभिषेकसारख्या विविध धार्मिक विधी केल्या जातात.. या सर्वात एक गोष्ट अशी आहे, ज्याला विशेष महत्त्व आहे. ती गोष्ट म्हणजे पंचामृत…हिंदू धर्मात पंचामृताला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधींमध्ये याला विशेष महत्त्व दिले जाते. पण याचे नेमके महत्त्व काय आहे? प्रत्येक पूजेनंतर पंचामृत हे प्रसाद म्हणून ग्रहण करण्यासाठी का दिले जाते?  पंचामृत अमृतासमान पवित्र का मानतात?  हे फार कमी लोकांना माहित आहे. जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि पौराणिक मान्यता…

पूजा -विधीत पंचामृताचे महत्त्व काय आहे? (Hindu Religion)

हिंदू धर्मात पंचामृताला अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार, पंचामृत हे केवळ एक पवित्र मिश्रण नसून ते शुभता, पवित्रता आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे. ‘पंचामृत’ हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे: ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘अमृत’ म्हणजे अमरत्व देणारा दैवी रस. हे सामान्यतः दूध, दही, तूप, मध आणि साखर किंवा खडीसाखर यांच्या मिश्रणाने तयार केले जाते. दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच पदार्थांपासून पंचामृत तयार केले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘अमृत’ म्हणजे अमृतासमान पवित्र पदार्थ, असा त्याचा धार्मिक अर्थ सांगितला जातो. देवतांच्या अभिषेकासाठी पंचामृताचा वापर केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार पंचामृताने अभिषेक केल्याने देवतेची कृपा प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-शांती व समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.

पौराणिक महत्त्व जाणून घ्या…

धार्मिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनादरम्यान अनेक दिव्य रत्नांसह अमृत कलश बाहेर आला. पंचामृत हे त्या अमृताचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे, पूजेमध्ये आणि देवतांच्या अभिषेकामध्ये त्याचा वापर अत्यंत शुभ मानला जातो. पुराणांमध्ये असे सांगितले आहे की, भगवान विष्णू, भगवान शिव, भगवान कृष्ण आणि इतर देवतांच्या अभिषेकामध्ये पंचामृताचा वापर केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. अशी मान्यता आहे.

पंचामृत प्रसाद म्हणून का दिले जाते?

पंचामृतात वापरल्या जाणाऱ्या पाचही पदार्थांना प्रतीकात्मक महत्त्व दिले जाते. दूध हे पवित्रतेचे, दही समृद्धीचे, तूप तेज आणि शुद्धतेचे, मध मधुरतेचे, तर साखर आनंद आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानली जाते.पूजेनंतर पंचामृत प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. देवाला अर्पण केलेले पंचामृत ग्रहण केल्याने शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी होते, अशी धार्मिक भावना आहे. विशेषतः भगवान शिव, श्रीकृष्ण, विष्णू आणि गणपतीच्या पूजेत पंचामृत अभिषेकाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे पंचामृत हे केवळ पूजेतील एक पदार्थ नसून भक्ती, पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

हेही वाचा :

Hindu Religion: तुमच्या घरातील देव्हाऱ्याला कळस आहे का? देवघराला कळस असावा की नसावा? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून थक्क व्हाल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *