Rohullah Mehdi News मिरा-भाईंदर: ड्रग्ज प्रकरणात काशिमीरा पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार असलेल्या मॉडेल आणि अभिनेता रोहुल्लाह मेहदी (Rohullah Mehdi) याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी विमानतळावर सापळा रचला होता. दिल्लीहून मुंबईत आलेल्या मेहदीला विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले.
रोहुल्लाह मेहदी हा मॉडेल आणि अभिनेता असून सोशल मीडियावर त्याचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स असल्याची माहिती आहे. या प्रकरणाच्या तपासात त्याचे ड्रग्ज नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय असून, पोलिसांकडून त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून ड्रग्ज पुरवठादार, नेटवर्कमधील इतर आरोपी आणि या हाय-प्रोफाइल प्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई डीसीपी झोन-1 राहुल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलिसांच्या पथकाने केली. (Rohullah Mehdi Marathi News)
चंदगडच्या हाजगोळीमध्ये MD ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर मोठी कारवाई- (Kolhapur Crime News)
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे MD ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, पुणे पथकाने मोठी कारवाई केलीये. या कारवाईत 6 जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण आणि सीमावर्ती भागात हा ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान MD तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य आणि रसायनेही जप्त करण्यात आली आहेत. सीमावर्ती भागात सुरू असलेल्या या अवैध ड्रग्स निर्मितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कारखान्यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. कारखान्यातून MD निर्मितीसाठी वापरले जात असलेले विविध कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर, ड्रिलसदृश मशीन आणि मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून यावर अधिकृतपणे संबंधित विभागाकडून अध्याप माहिती मिळणे अपेक्षित आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!