Rahu Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला (Rahu Gochar) मायावी ग्रह म्हणतात. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांवर राहूची कृपा असते त्यांना स्वर्गाहूनही सुंदर दिवस पाहायला मिळतात. तर, ज्या राशींच्या लोकांवर राहूची वक्र दृष्टी असते अशा राशींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 2026 वर्षाच्या शेवटी राहू ग्रह आपल्या चालीत बदल करणार आहे.
राहूचं संक्रमण मीन राशीत होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, राहू ग्रह जवळपास 18 महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. राहूचं मकर राशीत संक्रमण मानवी जीवनावर प्रभाव टाकणारं आहे. त्यामुळे या काळात कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
राहूच्या संक्रमणाचा वृश्चिक राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अनेक चढ-उतार जाणवतील. या कालावधीत कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करु नका. वैवाहिक जीवनात देखील वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण फार महत्त्वाचं ठरणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य आणि राहू यांच्यात मैत्रभाव अजिबात नाही. त्यामुळे तुम्हाला या काळात कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करावा लागेल. नात्यात चः-उतार जाणवतील. आर्थिक स्थिरता नसेल.
राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्याचे उपाय
ज्योतिष शास्त्रानुसार, राहूच्या प्रकोपापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर नियमितपणे शिवलिंगावर पाणी चढवा. दररोज रुद्राक्ष माळ घेऊन जप करा. या व्यतिरिक्त शनिवारच्या दिवशी काळे तीळ किंवा वस्त्राचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Baba Vanga Prediction : मेच्या शेवटच्या आठवड्यासाठी बाबा वेंगाची भविष्यवाणी; कर्क, सिंहसह 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, कुंडलीत जुळून येणार राजयोग
आणखी वाचा