भारतीय मिश्र डिसएबिलिटी क्रिकेट संघाने आज पुन्हा एकदा क्रिकेट (Cricket) चाहत्यांना सौरव गांगुलीच्या टी-शर्ट सीनची आठवण झाली. कारण, इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर 2002 मध्ये सुरू असलेल्या नेटवेस्ट सिरीजमध्ये सौरव गांगुलीने भारताच्या विजयानंतर टी-शर्ट उतरवरुन गरागरा फिरवला होता. त्याकाळी, सोशल मीडिया नव्हता मात्र माध्यमांमध्ये आणि वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर ती गांगुलीचा तो अवतार जगाने पाहिला होता. आता, तेच मैदान, तेच ठिकाण आणि तोच क्षण पुन्हा एकदा भारतीय (Team india) क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला आहे.
भारताच्या मिश्र डिसएबिलिटी संघाने लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर इंग्लडचा पराभव करत 24 वर्षांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. कारण, या विजयानंतर लॉर्डसच्या गॅलरीत असलेल्या भारतीय खेळाडूंनी चक्क टी-शर्ट काढून विजयाचं सेलिब्रेशन केलं. सामना पाहत गॅलरीत उभारलेल्या एका भारतीय खेळाडूने आपला टी-शर्ट काढून अगदी 2002 च्या नेटवेस्ट ट्रॉफीतील अंतिम सामन्याच्या विजयी सेलिब्रेशनची पुनरावृत्ती केली. तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने ज्या पद्धतीने विजयाचा आनंद साजरा केला होता. अगदी, त्याच स्टाईलने हा विजय आज तिथं भारतीय खेळाडू आणि एका अधिकाऱ्याने साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भारताच्या मिश्र डिसएबिलिटी क्रिकेट संघाची इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 7 सामन्यांच्या मालिकेतील आज अंतिम सामना होता. आजचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवण्यात आला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 206 धावा केल्या, या मालिकेतील सामन्यांतील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्यामुळे, 207 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इग्लंडच्या संघाचा 88 धावांतच धुव्वा उडवला. त्यामुळे, भारताने अंतिम सामना 118 धावांनी जिंकला. इंग्लंडचा कर्णधार कैलाम फ्लिनने भारतीय टीम संघाचे कौतुक करत भारतीय संघ विजयाचा हक्कदार होता, असे म्हटले. दरम्यान, भारतीय संघ ही मालिका यापूर्वीच पराभूत झाली आहे, 7 सामन्यांच्या मालिकेत इंग्लडने 4-3 ने ही मालिका जिंकली. मात्र, अंतिम सामन्यातील विजयानंतरचे सेलिब्रेशन इंग्लंडच्या जिव्हारी लागणारे ठरले आहे. सोशल मीडियावर या विजयी सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटीझन्सनेही प्रतिसाद देत सौरव गांगुलीच्या आठवणी जागवल्या आहेत.
लार्ड्स की बालकनी में सौरव गांगुली मूवमेंट… भारतीय मिक्स्ड डिसेबिलिटी टीम ने लार्ड्स में इंग्लैंड की टीम को आसानी से पराजित किया तो उनके खिलाड़ियों ने टीशर्ट उतारकर जश्न मनाया। pic.twitter.com/rZukhY1lyZ
— Abhishek Tripathi / अभिषेक त्रिपाठी (@abhishereporter) August 19, 2026
हेही वाचा