Pune Gangwar : मुसळधार पाऊस.. कार ठोकली अन् बेछुट गोळीबार…, शिरूरच्या करडे घाटात गँगवॉर, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं? | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

Pune Gangwar Vishal Kale Murder Case : आपल्यावर हल्ला झाल्याचं लक्षात येताच काळे आणि त्याचा मित्र जगदाळे याने पळ काढला अन् समोर दिसणाऱ्या ढाब्याच्या दिशेने दोघंही पळत सुटले. मागून आरोपी त्यांचा पाठलाग कर होते.

Pune Crime Gangwar Vishal Kale Murder Case
Pune Crime Gangwar Vishal Kale Murder Case

Pune Crime Gangwar Vishal Kale Murder Case : शिरूर तालुक्यातील करडे घाटात गुन्हेगारी संघर्ष उफाळून आला आहे. दोन गुन्हेगार गटांच्या वादातून गोळीबार झााला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. विशाल सुनील काळे असं गोळीबारात मृत्युमूखी पडलेल्या तरूणाचं नाव असून, केदार चंद्रकांत झाडगे आणि उमेश अनिल जगदाळे हे दोन तरुण जखमी झाले आहेत. झाडगे याच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार चालू आहेत. जगदाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सनी संजय यादव आणि विशाल पन्दी यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुसळधार पाऊस अन् बेछुट गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काळे हा केदार झाडगे आणि उमेश जगदाळे यांच्यासोबत काही कामानिमित्त बाहेर गेला होता. गाडी नंबर एमएम 12 एक्सक्यु 5704 या कारमधून तिघंही आपलं काम करून निघाले होते. त्यावेळी पाऊस सुरू झाला होता. जोराचा पाऊस सुरू असताना त्यानंतर समोरून आलेल्या एमएच 14 एलए 1128 या कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर सगळे कारमधून उतरले अन् काळे यांच्या साथिदारांवर बेछुट गोळीबार झाला.

विशाल काळेला गोळी लागली अन्…

आपल्यावर हल्ला झाल्याचं लक्षात येताच काळे आणि त्याचा मित्र जगदाळे याने पळ काढला अन् समोर दिसणाऱ्या ढाब्याच्या दिशेने दोघंही पळत सुटले. मागून आरोपी त्यांचा पाठलाग कर होते. हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. उमेश जगदाळे हा ढाब्याच्या आडोशाला लपून बसला अन् मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. अशातच विशाल काळे याला यावेळी गोळी लागली अन् तो रस्त्यावरच पडला. त्यावेळी मागून सनी यादव आणि त्याचा सहकारी दुचाकीवरून त्याचा पाठलाग करत होते. दोघांनी विशाल काळेला धरलं अन् त्याच्या डोक्यात दगड घातला.

हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला

दरम्यान, विशाल काळेला बेदम मारहाण केल्यानंतर त्यांनी आलेल्या दुचाकीवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आता हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.

मराठी बातम्या/पुणे/

Pune Gangwar : मुसळधार पाऊस.. कार ठोकली अन् बेछुट गोळीबार…, शिरूरच्या करडे घाटात गँगवॉर, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *