Tim David News : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वात मोठा ट्विस्ट! टिम डेव्हिडवर BCCIने घातली बंदी, नेमकं काय घडलं? पाहा Video


RCB Tim David Suspended : सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड याच्यावर इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रशासनाने कठोर कारवाई करत पुढील हंगामातील एका सामन्यासाठी बंदी घातली आहे. याशिवाय त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के रकमेचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी टिम डेव्हिड दोषी आढळला. या प्रकरणात त्याला दोन डिमेरिट गुण देण्यात आले असून, त्याच्या खात्यातील एकूण डिमेरिट गुणांची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यामुळे नियमांनुसार त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली.

नेमकं काय घडलं? (RCB’s Tim David suspended for opening game of IPL 2027)

आयपीएलच्या निवेदनानुसार, टिम डेव्हिडने खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.9 चे उल्लंघन केले. हा नियम सामना सुरू असताना एखाद्या खेळाडू, पंच, मॅच रेफरी किंवा इतर व्यक्तीच्या दिशेने चेंडू अथवा क्रिकेट साहित्य धोकादायक किंवा अयोग्य पद्धतीने फेकण्याशी संबंधित आहे. फायनल सामन्यादरम्यान पहिल्या डावातील 10व्या षटकात विकेट पडल्यावर टिम डेव्हिडने मैदानावरील पंच नितीन मेनन यांच्या दिशेने संतापाच्या भरात आइस बॅग फेकल्याचे आढळून आले. या कृतीला आयपीएलने गंभीर मानत त्याच्यावर कारवाई केली.

टिम डेव्हिडने चूक मान्य केली (Tim David IPL 2026)

या प्रकरणात टिम डेव्हिडने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी सुनावलेली शिक्षा देखील स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणावर अधिक सुनावणीची गरज भासली नाही.

यंदाच्या हंगामातील तिसरा गुन्हा (Tim David IPL 2026)

विशेष म्हणजे, आयपीएल 2026 हंगामात टिम डेव्हिड आचारसंहितेचे उल्लंघन करताना तिसऱ्यांदा दोषी आढळला आहे.

11 मे : मुंबई इंडियन्सविरुद्ध (Tim David RCB VS MI IPL 2026)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर  टिम डेव्हिडवर 2.6 नियमा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अशोभनीय, अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह हावभाव केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यावेळी त्याला मॅच फीच्या 30 टक्के दंडासह दोन डिमेरिट गुण देण्यात आले होते.

13 एप्रिल : पंचांच्या सूचनांकडे दुर्लक्ष (Tim David RCB VS MI IPL 2026)

यापूर्वी 13 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच झालेल्या आणखी एका सामन्यात पंचांच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे त्याला अनुच्छेद 2.4 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. त्या वेळी मॅच फीच्या 25 टक्के दंडासह एक डिमेरिट गुण देण्यात आला होता.

विजेतेपदाच्या आनंदात RCBला धक्का 

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. मात्र विजेतेपदाच्या आनंदावर आता टिम डेव्हिडवरील या कारवाईमुळे काहीसे विरजण पडले आहे. पुढील हंगामाच्या सुरुवातीलाच आरसीबीला आपल्या महत्त्वाच्या फिनिशरशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *