Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral – Marathi News | Ajinkya rahane announced his retirement from international cricket


भारताचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली. सर्व फॉरमेटमधून रहाणे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणे यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे. राहणे यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता क्रिकेटप्रेमींना धक्का मिळाला आहे. अजिंक्य यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 38 वर्षीय रहाणेने 2013 मध्ये सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले. मात्र, 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या परदेशातील कसोटी मालिकेनंतर तो भारतासाठी खेळलेला नाही.

अजिंक्य रहाणे हा त्या निवडक भारतीय खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचा कर्णधारपदाचा विक्रमही उत्कृष्ट होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यात संघाने चार सामने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित राहिले. विशेष बाब म्हणजे, त्याच्या कर्णधारपदाखाली भारताला कसोटी क्रिकेटमध्ये एकाही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रहाणेने तीन सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, ज्यात भारताने विजय मिळवला. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, ज्यात भारताने एक सामना जिंकला आणि एक गमावला.

अजिंक्यने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे, 38 वर्षीय अजिंक्य रहाणेने लिहिले, “कॅप क्रमांक 278, चला तर मग. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी सदैव कृतज्ञ राहीन.” या संदेशाद्वारे त्याने आपले चाहते, संघसहकारी, प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  रहाणेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  रहाणे 12 वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळला. या काळात त्याने भारतीय संघाचे 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *