गुळापासून बनवा ‘हे’ पौष्टिक गोड पदार्थ, तुम्हाला चवीसोबतच मिळेल भरपूर पोषण – Marathi News | Make nutritious sweets using jaggery you will get plenty of nutrition along with great taste


सण असो, कार्यक्रम असो, विशेष प्रसंग असो किंवा जेवणानंतरचा एखादा गोड पदार्थ असो, आपल्या घरातील प्रत्येकाला गोड पदार्थ खायला खुप आवडतं. त्‍यामुळे अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. आपल्यापैकी अनेकजण आरोग्याची काळजी घेताना साखरयुक्त गोड पदार्थ खाण्यास मनाई करतात. गुळापासून बनवलेले पदार्थ हा याकरिता एक चांगला पर्याय आहे. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे आणि काही अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणूनच, गुळाला फार पूर्वीपासून पारंपरिक आहाराचा एक भाग मानले जाते.

गुळाचा उपयोग केवळ चहा किंवा हिवाळ्यातील पदार्थांपुरता मर्यादित नाही. तर विविध प्रकारच्या चविष्ट गोड पदार्थ बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो, ज्या आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात. योग्य घटकांसह आणि संतुलित प्रमाणात तयार केल्यास या गोड पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश केला जाऊ शकतो. चला गुळापासून बनवल्या जाणाऱ्या काही आरोग्यदायी व चविष्ट गोड पदार्थ आणि त्या बनवताना कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात.

गुळापासून हे 4 पौष्टिक आणि चविष्ट गोड पदार्थ बनवा

गुळ आणि तिळाचे लाडू

गूळ आणि तिळाचे लाडू बनवण्यासाठी प्रथम तीळ हलके भाजून घ्या. आता एका कढईत थोडे तूप टाकून त्यात गुळ टाका आणि त्याचा पाक तयार करा. या गुळाच्या पाकात भाजलेले तीळ टाकून मिश्रण मिक्स करा. त्यानंतर मिश्रण थंड होण्याआधी त्याचे लहान लाडू बनवा. हा गोड पदार्थ लोह, कॅल्शियम आणि आरोग्यदायी चरबीचा चांगला स्रोत मानला जातो. याचे माफक प्रमाणात सेवन केल्याने शरीराला ऊर्जा देखील मिळते.

गुळाची खीर

गुळाची खीर बनवण्यासाठी प्रथम तांदूळ दुधात पूर्णपणे शिजवून घ्या. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात किसलेला गूळ चांगला मिक्स करून ढवळून घ्या. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही वेलची पूड देखील टाकू शकता. ही खीर केवळ चविष्टच नाही, तर कॅल्शियम आणि लोहासारखी पोषक तत्वे देखील पुरवते. ती गरम आणि थंड दोन्ही प्रकारे खाल्ली जाऊ शकते.

गूळ आणि नारळाची बर्फी

गूळ आणि नारळाची बर्फी बनवण्यासाठी किसलेला नारळ हलका भाजून घ्या. नंतर त्यात बारीक केलेला गूळ मिक्स करून काही मिनिटे शिजू द्या. हे मिश्रण तेल लावलेल्या ताटावर पसरवून थंड होऊ द्या आणि हव्या त्या आकारात त्याचे काप करा. नारळाची बर्फी खाण्यास तयार आहे. तर ही बर्फी केवळ चविष्टच नाही, तर फायबर आणि लोहाचा चांगला स्रोत देखील आहे.

गुळाचे पदार्थ बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

गुळाचे पदार्थ बनवताना नेहमी स्वच्छ आणि उत्तम प्रतीचा गूळ निवडावा. गूळ मोठ्या आचेवर जास्त वेळ शिजवणे टाळावे, कारण यामुळे त्याच्या चवीवर आणि काही पौष्टिक मूल्यांवर परिणाम होऊ शकतो. जर एखाद्या पदार्थामध्ये दुधाचा वापर केला असेल, तर उकळत्या दुधात थेट गूळ टाकू नका.

दूध थोडे थंड होऊ द्या, नंतर त्यात गूळ घाला. एखादा गोड पदार्थ तयार करताना त्यात तूप आणि गूळ संतुलित प्रमाणात वापरा. ​​तसेच पूर्णपणे थंड झाल्यावर गोड पदार्थाचा स्वाद आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवून द्या

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *