E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम


नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून पेट्रोलमधील इथेनॉलच्या ब्लेंडिंगचं समर्थन केलं जातंय. दुसरीकडे E20 च्या मुद्यावर सोशल मीडियावर E20 जनता पार्टी स्थापन करत मोहीम सुरु करण्यात आली आहे. नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारचा ई 20 संदर्भात वाहन कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा केला आहे. वाहन उत्पादक कंपन्या 2023 पूर्वीच्या पेट्रोल वाहनांसाठी ई20 इंधन उपयुक्त आहे की नाही याबाबत सार्वजनिकपणे माहिती सांगत नसल्याचं केजरीवालांनी म्हटलं.

सरकारचा वाहन कंपन्यांवर दबाव 

अरविंद केजरीवाल म्हणाले की पत्रकार परिषदेत म्हणाले की त्यांनी 29 वाहन उत्पादक कंपन्यांना पत्र लिहून 2023 पूर्वीच्या पेट्रोल वाहनांसाठी ई 20 इंधनाचा वापर सुरक्षितपणे करता येऊ शकते का असा सवाल केला. जर वाहनांना यामुळं नुकसान होत असेल, वाहनांच्या मायलेजवर प्रतिकूल परिणाम होतोय का? तसं असल्यास कंपन्या देखभालीचा खर्च उचलणार की ग्राहकांना नुकसान भरपाई देणार असे प्रश्न विचारल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.  या मुद्यांवर वाहन उत्पादक कंपन्या आणि केंद्र सरकारकडून उत्तर दिलं जात नसल्याचं म्हटलं. अरविंद केजरीवाल यांनी कोणत्याही कंपनीनं लेखी उत्तर दिलं नाही, असा दावा केला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की त्यांनी नऊ वाहन उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा केली. अधिकाऱ्यांनी फोनवर म्हटलं की 2023 पूर्वीच्या वाहनांमध्ये ई २० च्या वापरानं इंजिन, इंजिन यंत्रणा आणि मायलेज प्रभावित होऊ शकतं. मात्र, अधिकारी सार्वजनिकपणे बोलण्यास तयार नसल्याचं केजरीवाल म्हणाले. 

केजरीवाल म्हणाले की वाहन उत्पादक कंपन्यांनी ई 20 इंधन जुन्या वाहनांसाठी सुरक्षित असल्याचं सांगावं अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. अरविंद केजरीवालांनी ई 20 इंधनाच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.  2023 पूर्वीच्या जवळपास 30 कोटी वाहनांवर ई 20 चा परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये 22 कोटी दुचाकी आणि 8 कोटी चारचाकी वाहनांचा समावेश आहे, असं  अरविंद केजरीवाल म्हणाले. 

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की इथेनॉल पेट्रोलपेक्षा अधिक महाग आहे. इथेनॉलचं कॅलोरिफिक वॅल्यू कमी असल्यानं मायलेज कमी मिळतं. यामुळं शेतकऱ्यांना देखील कोणताही लाभ झालेला नाही. अरविंद केजरीवाल म्हणाले की पोलिसांकून शनिवारी कॉनस्टिट्यूशन क्लबमधील ई 20 वरील आयोजित राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न केला जातोय. 

दरम्यान,  ई 20 च्या मुद्यावर पुढील आठवड्यात मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *