IND vs ZIM: पहिली टी20 मालिका जिंकल्यानंतर काय शिकायला मिळालं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला… – Marathi News | What were the takeaways after winning the first T20 series Captain Shreyas Iyer said


IND vs ZIM: पहिली टी20 मालिका जिंकल्यानंतर काय शिकायला मिळालं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…Image Credit source: PTI

भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी लोळवलं आणि मालिका 3-0 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेपूर्वी भारताने दोन टी20 मालिका एकही विजय न मिळवता गमावल्या होत्या. त्यामुळे या मालिकेत टीम इंडिया कमबॅक करेल का? हा प्रश्न होता. कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर झिम्बाब्वेतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी फार वेळ मिळाला नाही. याबाबतची खंतही खेळाडूंनी व्यक्त केली होती. पण भारताने ही सर्व कारणं बाजूला ठेवून मेहनतीवर लक्ष केंद्रीत केलं. त्यात त्यांना यशही मिळालं. भारताने तीन सामन्यात झिम्बाब्वे कुठे भारी पडू दिलं नाही. तिन्ही सामन्यात भारताने सहज जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने पहिला टी20 मालिका विजय मिळवला. त्यामुळे श्रेयस अय्यरलाही विजयाचं समाधान मिळालं असणार यात काही शंका नाही. कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या मालिकेतून काय शिकलो हे देखील सांगितलं.

काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?

कर्णधार म्हणून पहिला मालिका विजय मिळाला आणि विजयातून काय शिकायला मिळालं? या प्रश्नावर श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आपण पाहिलंच आहे की ते किती निर्भय आहेत, तरुण खेळाडूंचा एक गट आहे जो मैदानावर प्रचंड ऊर्जा आणि हेतू दाखवत आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही सलग सामने खेळता. एक कर्णधार आणि एक संघ म्हणून मला अशा प्रकारच्या ऊर्जेची गरज असते, आणि त्यांनी आज सलग सामन्यांमध्येही ती सिद्ध केली. झिम्बाब्वेमध्ये ही मालिका जिंकणे माझ्यासाठी एक विशेष भावना आहे. 3-0 ने विजय मिळवला. त्यामुळे हा एक विशेष क्षण असणार आहे.’

संघातील काही तरुण खेळाडूंपेक्षा जास्त सामने खेळल्यामुळे एक कर्णधार म्हणून तुमच्यावर थोडी अतिरिक्त जबाबदारी होती का? त्यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘मला वाटतं, तुम्ही रेकॉर्ड पाहिल्यास, मी त्या सर्वांच्या तुलनेत जवळपास तितकेच सामने खेळलो आहे. ते सुमारे 55 ते 60 आहेत. त्यामुळे, अनुभवाच्या बाबतीत, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना प्रचंड अनुभव आहे कारण आजकाल ते आयपीएलमध्येही खेळतात. ते विशेष प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून जे सर्वोत्तम मिळवता येईल, ते संघासाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा मी मैदानावर उतरतो, तेव्हा ते आरामदायक आणि निवांत राहतील याची मी खात्री करतो, कारण तेव्हाच त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेता येते.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *