Last Updated:
“जनता काय म्हणते, हे पाहणे गरजेचं आहे. जनतेसाठी आपण दोन पावलं पुढे आलो, त्यांच्या भल्यासाठी चांगलं आहे.
राळेगणसिद्धी : नीट पेपर लिक प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने पुकारल्याला देशव्यापी आंदोलनाला अखेर यश आलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे, हिंसेने कधीच प्रश्न सुटत नाहीत, संवादातूनच मार्ग निघतो, असं स्पष्ट मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. राळेगणसिद्धीमध्ये पत्रकारांनी अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, “जनतेच्या भावना जाणून घेणे आवश्यक आहे. जनतेच्या हितासाठी दोन पावले पुढे जावे लागले तरी हरकत नाही. मात्र, केवळ राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत.”
तसंच, हिंसेच्या मार्गाने कधीच तोडगा निघत नसल्याचे सांगताना अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनांचा संदर्भ दिला. “कोणताही प्रश्न हा संवादाने सुटत असतो. तेढ निर्माण करून प्रश्न सुटत नाही. चुकीच्या मार्गाने प्रश्न सुटणार नाही. माझी २२ उपोषण झाली पण कधी हिंसाचार केला नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, यामध्ये कुणाचा पराभव झाला, कोण जिंकलं हे महत्वाचं नाही. पण , समाजाच्या भल्यासाठी जे चांगलं आहे ते केलं पाहिजे. पत्रकारांनी पुन्हा एकदा प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता, अण्णा म्हणाले की, ‘मला माहिती नाही.’
तसंच, “जनता काय म्हणते, हे पाहणे गरजेचं आहे. जनतेसाठी आपण दोन पावलं पुढे आलो, त्यांच्या भल्यासाठी चांगलं आहे. राजीनामा देऊन कधी प्रश्न सुटत नाही. संवाद, सलोखा याच्यामुळे प्रश्न सुटत असतात. मी २२ आंदोलनं केली, कधीच हिंसाचार केला नाही. सलोखा ठेवला पाहिजे, माझ्या आंदोलनामुळे अनेक महत्त्वाचे कायदे आले. हिंसाचार करणे ठीक नाही. कुणी असेल त्यांनी असा निर्णय घेऊ नये. लोकशाही आहे, हुकुमशाही नाही, जे लोकशाहीच्या मार्गाने होईल जे होईल. सत्याच्या मार्गाने आपण चाललं पाहिजे, कुणी काय म्हटलं उपयोग नाही, सत्य हेच परमेश्वर आहे, त्याच मार्गाने चाललं पाहिजे’ असा सल्लाही अण्णांनी दिला.
Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
Anna Hazare: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया, सरकारचे पुन्हा टोचले कान, म्हणाले…
