Shukra Transit 2026 : शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?


Shukra Transit 2026 : द्रिक पंचांगानुसार, शनिश्चरी अमावस्या म्हणजेच शनि जयंती (Shani Jayanti 2026) यंदा 16 मे 2026 रोजी आहे. मात्र, शनि जयंतीच्या दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. म्हणजेच 14 मे रोजी शुक्र ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याचाच अर्थ शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शुक्र ग्रहाचा देखील प्रभाव असणार आहे. हे संक्रमण ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने फार सकारात्मक ठरणार आहे. या कालावधीत 12 राशींवर कसा होणार परिणाम ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

शुक्र मेष राशीच्या तिसऱ्या चरणात असणार आहे. त्यामुळे या काळात कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्र वृषभ राशीच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या जीवनात सुख शांती टिकून राहील. तसेच, तुमचं बॅंक बॅलेन्स वाढेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

शुक्राचं संक्रमण मिथुन राशीतच होणार आहे. त्यामुळे तुमच्यात आकर्षण वाढेल. पैसा तुमच्याकडे आकर्षिला जाईल. तसेच, घरातील वातावरण सकारात्मक असणार आहे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

शुक्र ग्रह कर्क राशीच्या द्वादश चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या खर्चात वाढ होईल. तसेच, तुमचं मन थोडं चलबिचल राहील. तुमच्या समस्या वाढतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी देखील हा काळ आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अनावश्यक वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी हा काळ लाभदायी ठरेल. तसेच, अनेक काळापासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी प्रमोशनच्या अनेक संधी मिळतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रह तूळ राशीच्या नवव्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. अचानक धनलाभ झाल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या अष्टम भावात संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. शअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं लाभदायी ठरेल. तसेच, आर्थिक स्थिती चांगली राहील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी शुक्राचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या सहाव्या चरणात शुक्राचं संक्रमण होणार आहे. या काळात पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं लाभदायी ठरेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. अनावश्यक खर्च वाढेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या पाचव्या चरणात संक्रमण होणार आहे. या काळात तुमच्यातील प्रेम, विश्वास अधिक मजबूत होईल. नवीन नाती निर्माण होतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

शुक्र ग्रह मीन राशीच्या चौथ्या चरणात संक्रमण करणार आहे. या काळात तुमच्या घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, कौटुंबिक मतभेद होऊ शकतात. 

हे ही वाचा :                                                                               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

June 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा महिना कसा असणार? कोणत्या 3 राशींना लागणार लॉटरी, वाचा मासिक राशीभविष्य

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *