सोशल मीडियाची लाईक, शेअरची दुनिया ही काही सेकंदाची असली तर प्रसिद्धीचा झगमगाट फार मोठा आहे. पण, मागील काही दिवसांपासून रिलस्टार तरुण आणि तरुणींनी आत्महत्या करणाऱ्याचा घटना वारंवार घडत आहे. अशातच एक सोलापूरमध्ये मंगळवेढा इथं एका रिलास्टार रोहिनी पाराध्ये हीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तिने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल पोलीस तपास करत आहे, अशातच हॉटेल व्यवसायाचा शाखा विस्ताराच्या तणावातून आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
