Rajkumar Rao: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये राजकुमार रावचा लूक Viral; चाहते उडवतायत खिल्ली


Rajkumar Rao: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguli) यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकच्या शूटिंगला कोलकात्यात सुरुवात झाली आहे. मुंबईतील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता चित्रपटाचं चित्रीकरण कोलकात्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी होत आहे. या चित्रपटात राजकुमार राव (Rajkumar Rao) सौरव गांगुलींची भूमिका साकारत असून चित्रपटाचं नाव ‘दादा: द सौरव गांगुली स्टोरी’ असं आहे.राजकुमार राव काही दिवसांपूर्वीच कोलकात्यात पोहोचला. बुधवारी तो कोलकाता मैदान परिसरात दिसला. लाल रंगाच्या ट्रॅकसूटमधील त्याचा लुक सध्या व्हायरल होत आहे. 

राजकुमार राव याचा सौरव गांगुली यांच्या बायोपिकमधील लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘दादा’ या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका बाजूला चाहते सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे अनेकांना राजकुमार रावचा लूक ‘दादा’सारखा वाटत नसल्याची प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

राजकुमार रावच्या ‘दादा’ लुकवर मीम्सचा पाऊस

मैदानावरील शूटिंगदरम्यानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. काही नेटकऱ्यांनी “राजकुमार राव सौरव गांगुलीपेक्षा मुनाफ पटेलसारखा दिसतोय,” अशी खिल्ली उडवली. दरम्यान, या लूकवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली असली तरी अनेक चाहत्यांनी राजकुमार रावच्या अभिनयावर विश्वास व्यक्त केला आहे. चित्रपटात तो सौरव गांगुलीच्या आयुष्यातील विविध टप्पे साकारणार असून, सध्या कोलकात्यात चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.

कोलकातामध्ये शुटींगचा पहिला टप्पा 

कोलकाता शेड्यूलचा पहिला टप्पा सौरव गांगुलीच्या बालपण आणि सुरुवातीच्या आयुष्यावर आधारित आहे. बेहालाच्या गल्लीपासून क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास या भागात दाखवण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी सौरव गांगुलीच्या बेहाला येथील घरापासून शूटिंगला सुरुवात झाली. बुधवारी ईस्ट बंगाल क्लब मैदानावर शूटिंग करण्यात आलं, जिथे सौरव गांगुलीने आर्यन क्लबकडून क्रिकेट खेळण्याचा काळ पुन्हा उभा करण्यात आला. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये भव्य सेट उभारण्यात आले होते. लाल ट्रॅकसूटमध्ये राजकुमार राव ‘दादा’च्या भूमिकेत शूटिंग करताना दिसला. कोलकात्यातील संघर्षमय सुरुवातीपासून लॉर्ड्स मैदानावर शर्ट फिरवत सेलिब्रेशन करण्यापर्यंतचा सौरव गांगुलीचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

 

 

चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवने करत असून संगीत दिग्दर्शक प्रीतम आहेत. चित्रपटाला ठसठशीत बंगाली रंग देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने करणार असल्याचं सांगितलं जात आहे. गांगुलीची पत्नी डोना गांगुलीच्या भूमिकेत तान्या माणिकतला दिसणार आहे. सौरव आणि डोनाच्या प्रेमकथेचाही चित्रपटात सविस्तर समावेश असणार आहे. काही भाग म्युझिकल सिक्वेन्सद्वारे दाखवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रपटाला अस्सल बंगाली टच देण्यासाठी बंगालमधील अनेक कलाकारांना महत्त्वाच्या भूमिका देण्यात आल्या आहेत. अपराजित अध्या सौरव गांगुलीची आई निरुपा गांगुली यांची भूमिका साकारत आहे. तर सास्वता चटर्जी वडील चंडी गांगुली यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.दरम्यान, अनेक वर्षांपासून ‘महाराज’ची भूमिका कोण साकारणार याबाबत चर्चा सुरू होती. रणबीर कपूर याचं नावही चर्चेत होतं. मात्र अखेर ही भूमिका राजकुमार रावच्या वाट्याला आली.

 

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *