Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात 15 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने हैदराबादच्या कर्णधाराचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी करत धिंगाणा घातला. सामन्याच्या अवघ्या 8 षटकांत राजस्थान रॉयल्सने 1 बाद 125 धावा केल्या, यात सिंहाचा वाटा वैभव सूर्यवंशीचा आहे.
He’s just getting started 😉
Vaibhav Sooryavanshi 🆚 Pat Cummins 🍿
Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/RYzAAbeVCZ
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर राजस्थानचा हल्लाबोल (Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator)
सामन्याची पहिली ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या पॅट कमिन्सपासून ते प्रफुल हिंगेपर्यंत, हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा वैभवने समाचार घेतला. पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये राजस्थानने नाबाद 80 धावा ठोकल्या, ज्यामध्ये बहुतांश धावा वैभवच्या बॅटमधून आल्या होत्या. वैभवने केवळ चौकार-षटकार मारले नाहीत, तर 334 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत हैदराबादच्या क्षेत्ररक्षणाची दाणादाण उडवून दिली. दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वाल (20 चेंडूत 25 धावा) संथ खेळत असताना, वैभवने संपूर्ण दबाव आपल्या अंगावर घेतला आणि हैदराबादला बॅकफूटवर ढकलले.
A hat-trick of sixes against Pat Cummins 👀
Vaibhav Sooryavanshi is causing mayhem out in the middle 🔥#TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/6PaVbPt9S9
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी (SRH vs RR Eliminator IPL 2026)
यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी अवघ्या 48 चेंडूत 125 धावांची सलामी दिली. या भागीदारीत तब्बल 97 धावा एकट्या वैभवच्या होत्या. 8 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर स्मरण रामचंद्रनने त्याचा झेल घेतला आणि वैभवचे ऐतिहासिक शतक अवघ्या 3 धावांनी हुकले.
सूर्यवंशीने ख्रिस गेलचा विक्रम मोडला ( Vaibhav Sooryavanshi breaks Chris Gayle record )
वैभव सूर्यवंशीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील आपल्या आक्रमक कामगिरीने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. तो एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. यापूर्वी, गेलने आयपीएल 2012 मध्ये 59 षटकार मारले होते. सूर्यवंशीने आता 60 पेक्षा जास्त षटकार मारले आहेत.
Every single person is on their feet as the 15-year-old walks off 🫡
Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/mpT3LAIEp0
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
वैभवची मोठी कामगिरी
या काळात, वैभव 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये आयपीएल अर्धशतक पूर्ण करणारा संयुक्त दुसरा फलंदाज ठरला आणि त्याने या विक्रमात निकोलस पूरनची बरोबरी केली. या दोघांनीही पाच वेळा 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये आयपीएल अर्धशतक पूर्ण केले आहे. हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा सहा अर्धशतकांसह या यादीत अव्वल स्थानी आहे.
वैभवची आणखी एक कामगिरी
15 वर्षीय वैभव आयपीएल सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा फलंदाजही ठरला आहे. त्याने पाचव्यांदा पहिल्या सहा षटकांत 50 पेक्षा जास्त धावा केल्या. यासह त्याने पाचव्यांदा हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला मागे टाकले, ज्याने चार वेळा हा पराक्रम केला होता. या यादीत अव्वल स्थानी असलेला दुसरा खेळाडू डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने पॉवरप्लेमध्ये सहा वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
We are out of words 👏👏
9⃣7⃣(29) of absolute force from Vaibhav Sooryavanshi 🔥🔥
Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/gtt63Wwkx1
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
सुरेश रैनाच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीशी बरोबरी! (Fastest fifty in IPL playoff history)
आयपीएल प्लेऑफच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम 2014 पासून ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाच्या नावावर होता. रैनाने 16 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आज तब्बल 12 वर्षांनंतर जगातील सर्वात मोठ्या लीगच्या प्लेऑफमध्ये खेळताना, एका 15 वर्षांच्या पोराने थेट सुरेश रैनाच्या त्या ‘एलिट’ क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा