Yo Yo Honey Singh On Bad Phase Of Life ; ‘विचित्र भास व्हायचे, बाथरुमचा दरवाजा न लावताच अंघोळ करायचो’ Yo Yo Honey Singh नं सांगितला कठीण काळ


Yo Yo Honey On Bad Phase Of Life : हनी सिंहने 2010 नंतरचा काळ खूप गाजवला, तरुणाई सतत त्याच्या गाण्यावर थिरकायची पण नंतर अचानक तो गायब झाला. या 7 वर्षांच्या कालावधीत त्याच्या आयुष्यात काय घडले हे त्याने सांगितले.

yo yo honey singh
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गायक, रॅपर आणि संगीतकार ‘यो यो हनी सिंह’ने 2010 च्या दशकात भारतीय पॉप संगीताच्या विश्वावर वर्चस्व गाजवले. त्याला तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतले होते. मात्र, कालांतराने दारु आणि अमली पदार्थांच्या व्यसनाने त्याला प्रसिद्धीपासून दूर केले. आपली हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी त्याला अनेक वर्षे लागली. आता, त्याने स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

गायकाने उघड केले आहे की, त्याचे डोक्यावरील सर्व केस गळाले असून त्याला टक्कल पडले आहे आणि तो विग वापरतो. एका पॉडकास्टमध्ये हनी सिंगने सांगितले की, अमली पदार्थांचे व्यसन आणि ‘बायपोलर डिसऑर्डर‘शी सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्याच्या डोक्यावरील सर्व केस गळाले होते.

‘हनी सिंग’ ने नुकतीच एक मुलाखत दिली तिथे तो म्हणाला की, कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपली मानसिक स्थिती कशी खालावली, आणि त्यानंतर अनेक वर्षे एकांतवासात व उपचारांखाली घालवाली लागली, अखेर त्याला बरे होण्याचा मार्ग कसा सापडला. त्याने घेतलेल्या औषधांचे परिणाम आणि दुष्परिणाम यांवरही त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

‘मला असे वाटत होते की जणू काही मी स्वर्ग आणि नरक यांच्या मधोमध अडकलेला.’

‘लुंगी डान्स’ आणि ‘ब्राउन मुंडे’ यांसारखी गाणी गाणाऱ्या हनी सिंहने सांगितले, ‘2018 आणि 2019 या संपूर्ण काळात, मला खात्री पटलेली मी आता मेलो आहे. मला वाटायचं की माझा मृत्यू झाला असून मी स्वर्ग व नरक यांच्या मधल्याच कुठल्यातरी जागेत अडकून पडलो आहे. जेव्हा जेव्हा माझी आई मला जेवण वाढायची, तेव्हा मी मनातल्या मनात विचार करायचो की हे माझे अगदी शेवटचे जेवण असेल. गेल्या सात वर्षांपासून मी तीच औषध घेत होतो, तरीही माझ्या प्रकृतीत सुधारणेची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. मात्र, जेव्हा अखेर मी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी माझा डॉक्टरही बदलला. त्यांनी माझ्या काही औषधांमध्ये बदल केले, काही नवीन औषधे सुरू केली त्यानंतर अवघ्या चार आठवड्यांतच, माझी प्रकृती सुधारू लागली. मी पुन्हा लोकांची भेट घेणे आणि आयुष्याला नव्याने सामोरे जाणे सुरू केले.’

Maharashtra TimesKarisma Kapoor Children Fees : करिश्मा कपूरच्या मुलांच्या शाळेची भरायला निधीतून मागावा लागतोय पैसा! सावत्र आई प्रियाने कोर्टात दाखल केली याचिका

“माझे वजन १०५ किलोवर पोहोचले होते, माझे सर्व केस गळून पडले”

हनी सिंगने पुढे उघड केले की, या औषधांचा त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला होता. “मी सलग सात वर्षे अत्यंत हाय डोस औषध घेत होतो. त्यामुळे माझे वजन प्रचंड वाढून 105 किलोवर पोहोचले आणि माझे सर्व केस गळून पडले. हे केस कृत्रिम आहेत. मी पूर्णपणे टकला आहे. हा एक विग आहे.” गायकाने हे देखील कबूल केले की, 2014 मध्ये अंमली पदार्थांचे सेवन थांबवल्यानंतरही, पूर्णपणे बरे होण्याची त्याची वाटचाल अत्यंत दीर्घ आणि खडतर होती.

जेव्हा तो भ्रम पहिल्यांदा बळावला

या गायकाने एबी टॉक्स या पॉडकास्टमध्येही सांगितले, “मी मुंबईत एका संगीत रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होतो आणि त्याच वेळी शाहरुख खानसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी मला काही भ्रम पडू लागले- ‘मी आता मरणार आहे.’ त्यावेळी मी शिकागोमध्ये होतो. माझ्यासोबत कोणीतरी होते आणि त्यांनी मला सांगितले की, ‘तुला तालमीसाठी जायचे आहे.’ मी त्यांना उत्तर दिले की, ‘मी तिथे जाऊ शकत नाही.’ शाहरुख भाईंनी मला फोन केला आणि विचारले की, ‘काय झाले?’ मी त्यांना म्हणालो, ‘मी ठीक होईन; मी तुम्हाला थेट स्टेजवरच भेटेन.’ त्या क्षणी, मी अत्यंत घाबरलो होतो. मला वाटत होते की, मी तिथेच स्टेजवर मरणार आहे; आणि हे संकट कसे टाळावे, याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो. स्टेजवर जावे लागू नये किंवा माझा शो कॅन्सल व्हावा म्हणून, मी माझ्या डोक्याचे अर्धे केस काढून टाकले मात्र, त्यावर ते लोक मला सहजपणे म्हणाले, ‘आम्ही तुझ्या डोक्यावर फक्त एक टोपी घालून देऊ.’ मला असे वाटत होते की, माझ्या आजूबाजूचे लोक मी नेमक्या कोणत्या मानसिक अवस्थेतून जात आहे, हे समजूनच घेऊ शकत नव्हते.”

Maharashtra TimesTharala Tar Mag : सचिनने डाव साधला, महिपतची तुरुंगातून सुटका! पोटातल्या बाळाला ढाल बनवून प्रिया करणार सासूला इमोशनल ब्लॅकमेल

‘मी ७ वर्षे माझ्या घराच्या आतच राहिलो’

हनी सिंग म्हणाला, “माझ्या आतमध्ये एक प्रकारची घालमेल सुरू होती. मी ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला हतबल वाटत होते. मग, मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला सांगितले की, माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. तिने मला सांगितले की, मी पुढे जाऊन तो शो परफॉर्म केलाच पाहिजे. केवळ दोन गाणी गायल्यानंतर, मी परफॉर्मन्स सोडून अगदी मध्यातूनच निघून गेलो. त्यानंतर, मी सलग सात वर्षे माझ्या घराच्या चार भिंतींच्या आतच बंदिस्त राहिलो.”

Pawan Choure Interview : ओंकार राऊत ऐवजी बिग बॉसमध्ये मी गेलो असतो तर राडा केला असता | पवन चौरे

आंघोळ करतानाही तो बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवायचो

त्याने पुढे सांगितले, “माझ्या चाहत्यांनी मला त्या अवस्थेत पाहावे, असे मला वाटत नव्हते. मी स्वतःला माझ्या घराच्या आतच कोंडून घेतले. अगदी माझ्या बालपणीच्या मित्रांनाही भेटलो नाही. कोणाशीही माझा काहीच संपर्क नव्हता. ना फोन कॉल्स, ना टीव्ही, ना इंटरनेट. जवळपास तीन वर्षे, ‘बायपोलर डिसऑर्डर’मुळे निर्माण होणाऱ्या भीतीशी आणि नकारात्मक विचारांशी मी झगडत होतो. तीन वर्षे मी माझ्या बेडरूमच्या बाहेर पाऊलही टाकले नाही. आंघोळ करतानाही मी बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवत असे.”

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा