Weekly Horoscope 27 July To 2 August 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. शेवटचा आठवडा कसा असेल याबाबत अनेकांना उत्सुकता असते. नवीन आठवडा 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 असा असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण तूळ ते मीन राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा लाभदायी असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, तुमचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा चांगलं दिसेल. एखादी व्यक्ती तुमच्या कडे आकर्षित होऊ शकते. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तसेच, धनसंपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. या कालावधीत कोणताही निर्णय घेताना सावधानता बाळगा. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नात्यातील संबंध चांगले राहतील.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी जुलैचा शेवटचा आठवडा सावधानतेचा असणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करण्याची गरज आहे. खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात कोणतीही नवीन वस्तूची खरेदी करु नका. पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. या कालावधीत तुम्हाला आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता मिळू शकते.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या कालावधीत पूर्ण करता येतील. तुमच्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा सतर्कतेचा असणार आहे. या कालावधीत ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या मार्गात देखील सहकाऱ्यांचा अडथळा पाहायला मिळेल. या कालावधीत तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप