Students Protest: पैसा कसा कमावू शकतो हेच तु्म्ही..; टीकाकारांना मराठी अभिनेत्रीने सुनावलं


Students Protest: पैसा कसा कमावू शकतो हेच तु्म्ही..; टीकाकारांना मराठी अभिनेत्रीने सुनावलं

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी जेव्हा संसद भवनावर धडक मोर्चा काढला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. या संपूर्ण घटनेवर विविध सेलिब्रिटी मोकळेपणे व्यक्त होत आहेत. यात अनेक मराठी कलाकारांचाही समावेश आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध करताच काही नेटकऱ्यांनी सेलिब्रिटींनाही ट्रोल केलंय. कलाकारांनी अशा मुद्द्यांमध्ये पडू नये, असा सल्ला काहींनी दिला. यावरून आता अभिनेत्री नेहा महाजनने सोशल मीडियावर पोस्ट लिहित टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

नेहा महाजनची पोस्ट-

‘तू राजकीय नाहीस, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ही व्यवस्था तुमच्या बाजूने काम करतेय. तुम्हाला बातम्या, इतिहास आणि संस्कृती यांची माहिती नाही. तुम्ही निर्दयी बनत आहात कारण तुम्हाला लोकांची काळजी नाही. तुम्ही स्वत:मध्येच मग्न आहात आणि मी आणखी पैसा कसा कमावू शकतो, हीच एक गोष्ट तुम्हाला प्रेरित करते’, असं तिने लिहिलं आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्येही तिने पुढे लिहिलंय, ‘जेव्हा तुम्ही म्हणता की तुझा राजकारणाशी काहीही संबंध नाही, तेव्हा ‘हे मला सोयीचं आहे’ असं सांगणारा तुमचा दृष्टीकोन हाच एक राजकीय दृष्टीकोन असतो. जेव्हा तुम्ही मला लिहिता आणि विचारता की ‘तू संगीतावरच लक्ष केंद्रीत का करत नाहीस?’ तेव्हा तुम्ही मला स्वार्थी बनण्यास सांगत असता. कारण तुम्ही स्वत: स्वार्थीपणे वागत असता. सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही आणि लोकांचं जीवन सुखकर करण्यासाठी काम न करणाऱ्या त्या वर्गाचा आळस आणि स्वार्थ यांच्याविरोधात केलेला उठाव म्हणजे एक प्रकारचा बचाव असतो. तुम्ही कलाकार असो किंवा बँकर, नेहमीच राजकीय असता.’

मराठी चित्रपटसृष्टीतील आणि कलाविश्वातील अनेकांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध केला आहे. यात सुबोध भावे, समीर चौघुले, हेमंत ढोमे, गिरीजा ओक, रसिका वेंगुर्लेकर, रवी जाधव यांचाही समावेश आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *