Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 27 July To 2 August 2026: जुलै (July 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होणार आहे, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. या आठवड्यात गुरूपौर्णिमेचा सण देखील येत आहे. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा मोठा करार मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात वाढ होईल, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज दूर होतील आणि नात्यात विश्वास वाढेल. विवाहितांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे, पण कागदपत्रांची पडताळणी अवश्य करा. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळेल. आरोग्य चांगले राहील, मात्र आहार संतुलित ठेवा.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी हा आठवडा अनेक नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा विस्ताराचे नियोजन यशस्वी ठरेल. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबीयांशी संवाद वाढेल आणि मतभेद मिटतील. प्रेमजीवन आनंदी राहील. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी 27 जुलै ते 2 ऑगस्ट या आठवड्यात संयम ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचा भविष्यात फायदा होईल. व्यवसायात मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम ठरू शकतो. प्रेमसंबंधात संवाद वाढवल्यास नाते अधिक मजबूत होईल 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी जुलैच्या शेवटचा आठवडा प्रगतीचा ठरेल. करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा होईल. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रेमजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा कामाचा ताण वाढला तरी तुमचे नियोजन यशस्वी ठरेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. व्यवसायात ग्राहकांची संख्या वाढेल. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. 

हेही वाचा :

Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांचं रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *