RCB vs GT: क्वालिफायर 1 सामन्यासाठी रजत पाटीदार सज्ज, मॅचपूर्वी शुभमन गिलला थेट वॉर्निंग दिली


Rajat Patidar On Qualifier 1: आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि गुजरात टायटन्सचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने आता गुजरातच्या संघाला इशारा दिला आहे.

rajat patidar on gujarat titans
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: आयपीएल 2026 हंगामाचा क्वालिफायर 1 सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. विजेता संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल. या परिस्थितीत, गतविजेता संघ म्हणून खेळणाऱ्या आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने गुजरात टायटन्सच्या संघाला एक इशारा दिला आहे.

रजत पाटीदारचे मोठे विधान

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने क्वालिफायर 1 च्या आधी गुजरातला एक खुले आव्हान दिले आहे. तो म्हणाला, “आमची गोलंदाजी ही आमची सर्वात मोठी ताकद आहे आणि सर्वांना माहीत आहे की भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम यांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हा एक मोठा सामना आहे आणि जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. पण आम्ही इथे आक्रमण करण्यासाठी आलो आहोत, बचाव करण्यासाठी नाही. आमचे लक्ष जलद विकेट्स घेण्यावर असेल. भुवनेश्वर, हेझलवूड आणि रसिक यांनी सातत्याने ही भूमिका बजावली आहे आणि संघाला आशा आहे की ही कामगिरी अशीच सुरू राहील.”
Maharashtra TimesRohit Sharma: पद्मश्री पुरस्कार सोहळ्याला रोहित शर्मा अनुपस्थित का राहिला? कारण समोर
पाटीदार म्हणाला, “आम्हाला जी काही खेळपट्टी आणि परिस्थिती मिळेल, त्यात आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. खेळपट्टी कशी असावी हे ठरवणे माझ्या हातात नाही.” आयपीएलचा अंतिम सामना बेंगळूरुहून अहमदाबादला हलवण्याबद्दल विचारले असता, पाटीदार म्हणाला, “हे माझ्या नियंत्रणात नाही. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, त्यामुळे अंतिम सामना जिथे होईल तिथेच खेळला जाईल. सध्या आमचे संपूर्ण लक्ष अंतिम फेरीत पोहोचण्यावर आहे.”

भुवनेश्वर कुमारची शानदार कामगिरी

भुवनेश्वर कुमारने या मोसमात आरसीबीसाठी आपल्या स्विंग गोलंदाजीने कहर केला आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 24 बळी घेतले असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गुजरात टायटन्ससाठी भुवनेश्वरविरुद्ध सावधपणे खेळणे महत्त्वाचे असेल, कारण पॉवरप्लेमध्ये एक-दोन बळी संघाला अडचणीत आणू शकतात.

आरसीबीने गेल्या मोसमात पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आरसीबी 11 व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचली आहे, परंतु आतापर्यंत फक्त एकदाच विजेतेपद पटकावले आहे. आता दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणे हे त्यांचे ध्येय असेल. गुजरात, राजस्थान आणि हैदराबादसारखे संघही याच विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. क्वालिफायर 1 सामना हा घर्मशाळा, पंजाब येथे रंगणार आहे.

सलोनी पाटील

लेखकाबद्दलसलोनी पाटीलसलोनी पाटील या सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. गेल्या ३ वर्षांपासून पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहे.
सलोनी गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करत आहेत आणि क्रीडा व बिझनेस क्षेत्रातील चालू घडामोडींवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे
सलोनी यांनी सामना, एबीपी माझा या ठिकाणी इंटर्नशीप केली आहे. ‘आम्ही पार्लेकर’ वृत्तपत्रात कॉ-ऑर्डिनेटर म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.
हेमा मालिनी संपादक असलेल्या ‘मेरी सहेली’ येथे सोशल मीडिया आणि व्हिडिओ एडिटर म्हणून काम. करण्याचा अनुभव आहे. ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. सलोनी यांनी साठ्ये कॉलेजमधून BMM चे शिक्षण आणि त्यानंतर कम्युनिकेशन अँड जर्नलिज्ममध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे.
आणखी वाचा