थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहीर आहे तरी कोण? पहिल्यांदाच आली समोर, नेमकं काय करते? | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

NEET पेपरफुटीविरोधात मुंबईत आंदोलनादरम्यान रिया अहीरने पोलिसांची व्हॅन अडवून विद्यार्थ्यांना सोडवले. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला असून झोया अख्तरनेही कौतुक केले.

News18
News18

मुंबई: NEET पेपरफुटी घोटाळ्याची झळ आता दिल्लीच्या जंतर-मंतरवरून थेट महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत पोहोचली आहे. दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान एक असा थरारक प्रसंग घडला, ज्याची चर्चा सध्या संपूर्ण देशात रंगली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर २५-२७ वर्षांची एक तरुण मुलगी अचानक भक्कमपणे उभी राहिली. पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून विद्यार्थ्यांना सोडायला लावणारी ही धाडसी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मॉडेल आणि अभिनेत्री रिया अहीर आहे. तिचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून बॉलिवूड दिग्दर्शिका झोया अख्तरनेही तिच्या या हिमतीचे फोटो शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

नेमकं काय घडलं शिवाजी पार्कवर?

बुधवारी दादर येथील आंदोलनात सहभागी झालेली रिया पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिली, ज्यामध्ये आंदोलक विद्यार्थ्यांना डांबण्यात आले होते. काहीही विचार न करता रियाने पोलिसांची व्हॅन रोखली आणि मुलांना सोडण्याची मागणी केली. तिने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि झालेल्या जोरदार वादविवादानंतर अखेर पोलिसांना नमते घ्यावे लागले आणि विद्यार्थ्यांना सोडावे लागले. या एका घटनेने रिया अहीर रातोरात स्टार बनली आहे.

कोण आहे ही बोल्ड अन् धाडसी रिया अहीर?

रियाचे पूर्ण नाव रिया यादव असून इन्स्टाग्रामवर ती ‘रिया इकोसिया’ म्हणूनही ओळखली जाते. २७ वर्षांची रिया ही एक यशस्वी मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका आहे. ‘रियासत’ नावाच्या स्वतःच्या क्लोदिंग ब्रँडअंतर्गत ती डिझायनर कपडे तयार करते. नुकतीच ती ‘दिलबरा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली होती. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाख १० हजारांहून अधिक फॉलोअर्स असून, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता अभिषेक बॅनर्जी यांसारखे दिग्गजही तिला फॉलो करतात.

मराठी बातम्या/मनोरंजन/

थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहीर आहे तरी कोण? पहिल्यांदाच आली समोर, नेमकं काय करते?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *