संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप


Priyanka Gandhi: देशभरात तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन पेटलं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित का राहत नाहीत? असा थेट सवाल काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केला. “सरकारला जे विचारून घ्यायचे आहे, तेच प्रश्न माध्यमांकडून विचारले जात आहेत,” असा आरोप करत प्रियांका गांधी संतापल्या. 

तरीही पंतप्रधान संसदेत येत नाहीत

संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसल्या. त्या म्हणाल्या, “देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे, इतके मोठे आंदोलन सुरू आहे, तरीही पंतप्रधान संसदेत येत नाहीत. संसद का चालत नाही, हा प्रश्न मला विचारण्याऐवजी, विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे काय झाले? त्यांच्यासाठी सरकार काय करत आहे? हे प्रश्न बाहेर पडणाऱ्या मंत्र्यांना विचारा.” शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत माध्यमांना घेरताना त्या म्हणाल्या, “तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा कधी देणार, असा थेट प्रश्न विचारला का? गोलगोल उत्तरे देऊ नका, ‘हो’ की ‘नाही’ यात उत्तर द्या.”

गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना त्या पुढे म्हणाल्या, “आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला गेला? लहान मुले रुग्णालयात का जमा आहेत? इंटरनेट सेवा खंडित करून पालकांचा संपर्क का तोडला गेला? विद्यार्थ्यांवर एनएसए (NSA) सारखा कडक कायदा लावण्याइतके ते काय दहशतवादी आहेत का? असे कठीण आणि महत्त्वाचे प्रश्न जेव्हा तुम्ही गृहमंत्र्यांना आणि सरकारला विचारायला लागाल, तेव्हाच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन.” 

भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा

दरम्यान, आधी स्वतःसाठी एक न्यायालय स्थापन करा. ज्या लोकांना भाजपने आपल्या पक्षात ठेवलं आहे, ज्यांच्यावर आरोप होते, आणि ते आरोप खूप गंभीर होते, ज्यांच्याबद्दल मोदी यांनी स्वतःच आपल्या भाषणांमध्ये सांगितले की या लोकांनी कितीतरी घोटाळे केले आहेत, त्यांनाच यांनी पक्षात आणले, मग त्यांच्यावर जलदगतीने कारवाई का करू नये? त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी का केली जात नाही? जी चौकशी सुरू होती ती का थांबवण्यात आली? आधी या प्रश्नाचे उत्तर द्या, असा थेट हल्लाबोल खासदार कपिल सिब्बल यांनी केला. मोदी यांनी पेपरफुटीवरून फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून कडक शिक्षा केली जाईल, असे म्हटले होते. यानंतर कपिल सिब्बल यांनी तोफ डागली. 

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *