दिल्लीतील जंतर मंतरवर नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. त्यामध्येच पोलिस व्हॅनला रोखून धरणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका हाताने या मुलीने पोलिसांची व्हॅन रोखून धरली. ज्यामुळे देशभरातून तिचे काैतुक केले जातंय. फक्त काैतुकच नाही तर यातून कॉकरोच पार्टीची ताकद दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले. हा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईतील आहे. एकटी मुलगी भारी पडल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे. दिल्लीतून सुरू झालेल्या जंतर मंतर येथील नीट परीक्षेचे आंदोलन देशभरात पोहोचले आहे. मुंबईत मोठा पाऊस सुरू आहे. एकटी मुलगी थेट पोलिस व्हॅन पुढे आली आणि तिने एका हाताने पोलिस व्हॅनला धरून ठेवले. यावेळी तिच्या हातात मोबाईल देखील दिसत आहे.
मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे आंदोलक केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जमले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी रिया यादव नावाची मुलगी हुडी आणि कॅप घालून थेट पोलिस व्हॅनच्या पुढे येऊन थांबले. तिने पुढे पोलिस व्हॅनला जाऊ दिले नाही.
विशेष बाब म्हणजे तिने काही वेळ ही पोलिस व्हॅन रोखून धरली. ज्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आंदोलकांची सुटका करण्यास वेळ मिळाला. या व्हायरल व्हिडीओनंतर सुपरगर्ल असे या मुलीला लोक म्हणत आहेत. यादरम्यान रिया हिने काही आरोपही केले. व्हिडीओमध्ये रिया म्हणते की, ते लोक आपले काम करत आहेत. मात्र, जबाबदारीने ते काम करत नाहीत. नागरिकांची जबाबदारीही त्यांचीच आहे.
आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी मुलीच्या धैर्याचे काैतुक केले. हा व्हिडीओ आणि मुलगी चर्चेचा चांगलाच मुद्दा बनली. रिया या व्हिडीओमुळे तूफान चर्चेत आले. रिया ज्यावेळी पोलिसांच्या व्हॅन पुढे थांबली होती. त्यावेळी तिथे अजूनही काही विद्यार्थी होती, त्यापैकीच एकाने हा व्हिडीओ शूट केला.