Kalki Puran: हिंदू धर्मग्रंथांनुसार सध्या कलियुग सुरू आहे. तसं पाहायला गेलं तर धर्मग्रंथांमध्ये चार युगांचे वर्णन करण्यात आले आहे. ते म्हणजे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग… कल्कि पुराण आणि इतर वैष्णव ग्रंथांमध्ये याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. याच कलियुगात भगवान विष्णूंचा दहावा आणि अंतिम अवतार भगवान कल्कि अवतार घेतील. पण तुम्हाला हे माहितीय का? अनेक लोकांना आश्चर्य वाटते, कलियुगाचा कोणता टप्पा सध्या सुरू आहे? हे युग संपायला किती वेळ उरला आहे? भगवान कल्की कधी अवतार घेतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे कल्की पुराणात आढळतात. जाणून घेऊया कल्कि पुराणात नेमकं काय म्हटलंय.,,,
कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? कल्कि पुराणात काय म्हटलंय..(Kalki Puran)
सनातन धर्मग्रंथांमध्ये चार युगांचे वर्णन आहे, त्यापैकी कलियुग सध्या सुरू आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या कलियुगाची एकूण कालमर्यादा 4,32,000 वर्षे मानली जाते. अनेक परंपरांनुसार कलियुगाची सुरुवात इ.स.पूर्व 3102 मध्ये भगवान श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील प्रस्थानानंतर झाली, असे मानले जाते. या गणनेनुसार आजपर्यंत सुमारे 5100 हून अधिक वर्षे उलटली असून, कलियुग संपण्यासाठी अजून सुमारे 4.26 लाख वर्षे शिल्लक आहेत. ही गणना धार्मिक परंपरा आणि पुराणांवर आधारित आहे. ज्योतिषी आणि धार्मिक नेत्यांच्या मते, सध्या हा कलियुगाचा सुवर्णकाळ आहे. कल्की पुराणानुसार, कलियुग जसजसे पुढे जाईल, तसतसे मानवी आयुर्मान, शक्ती आणि नैतिकता हळूहळू कमी होत जाईल.
भगवान कल्कींचा जन्म केव्हा होईल? (Lord Kalki)
भगवद्गीतेनुसार, पूर्वीच्या युगांमध्ये वाईटपणा काही मोजक्या व्यक्तींपुरता मर्यादित होता, परंतु कलियुगात तसे नाही. या युगात, वाईटपणा प्रत्येक व्यक्तीमध्ये वास करतो. लोभ, हिंसा, कपट आणि स्वार्थ यांसारख्या राक्षसी प्रवृत्तींनी मानवांमध्ये मूळ धरले आहे. कल्कि पुराणानुसार, कलियुग जसजसे पुढे जाईल, तसतसे धर्म, सत्य आणि श्रद्धा क्षीण होतील, तर स्वार्थ, लोभ आणि अहंकार वाढेल. कलियुगाच्या शेवटी, लोक अधिकाधिक स्वार्थी, हिंसक आणि नीतिमत्ताहीन बनतील. खोटेपणा आणि फसवणूक पसरेल. सत्ताधारी अन्याय करतील आणि सामान्य जनता दुःख भोगेल. त्यानंतर, भगवान विष्णू कल्की रूपात अवतार घेतील, अधर्माचा नाश करतील आणि सत्ययुगाची सुरुवात करतील. शास्त्रानुसार, जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा पापींचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू कल्की अवतार घेतील. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान कल्की पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन, तलवार धारण करून येतील आणि अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करतील.
सत्ययुगाची पुन्हा सुरुवात…?
पुराणांनुसार भगवान कल्कि यांच्या अवतारानंतर कलियुगाचा अंत होईल आणि सत्ययुगाची पुन्हा सुरुवात होईल. धर्म, सत्य, दया आणि न्याय यांची पुनर्स्थापना होईल, असे वर्णन करण्यात आले आहे. मात्र, भगवान कल्कि नेमके कोणत्या वर्षी किंवा तारखेला अवतार घेतील, याचा कोणताही निश्चित उल्लेख कोणत्याही प्रमुख हिंदू धर्मग्रंथात आढळत नाही. त्यामुळे त्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणारे दावे किंवा ठराविक तारखा धार्मिकदृष्ट्या प्रमाणित मानल्या जात नाहीत.
हेही वाचा :
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांचं रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया