Anupam Kher On Student Protest: राजधानी दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे कथित ‘नीट’ (NEET Paper Leak Case) पेपरफुटीच्या प्रकरणावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. अनेक ठिकाणी जेन-झी जनरेशन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अनेक क्षेत्रांतील लोक एकवटले आहेत. अनेक सेलिब्रिटीही विद्यार्थ्यांसोबत मैदानात उतरलेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन विद्यार्थ्यांना पाठींबा जाहीर केलाय.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ जारी करून विद्यार्थ्यांना आपला मनापासून पाठिंबा दर्शविला आहे. या व्हिडीओमध्ये, आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या भावना आणि संघर्षाची दखल घेत, अनुपम खेर यांनी त्यांना आपल्या हक्कांबद्दल जागरूक राहण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
छात्र किसी भी देश की सबसे बड़ी उम्मीद होते हैं। उनकी आवाज़ को सुना जाना चाहिए, समझा जाना चाहिए और उसका सम्मान होना चाहिए।
मेरी केवल एक प्रार्थना है—अपनी लड़ाई, अपना मुद्दा और अपनी सोच किसी और के हाथों का औज़ार मत बनने दीजिए।
यह संदेश किसी के पक्ष या विपक्ष में नहीं, बल्कि हमारे… pic.twitter.com/uIdcnbOOoH— Anupam Kher (@AnupamPKher) July 22, 2026
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर नेमकं काय म्हणाले?
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर म्हणाले की, “नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, दोन दिवसांपूर्वी तुमच्या आंदोलनाचे फोटो पाहून मी अस्वस्थ आणि दुःखी झालो. आपली मतं व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला अशा परिस्थितीतून जावं लागू नये. मी सुद्धा एकेकाळी विद्यार्थी होतो, मी सुद्धा प्रश्न विचारले होते. मी व्यवस्थेशी भांडलो आहे. आजही माझ्या संस्थेत शेकडो विद्यार्थी आहेत. त्यामुळे, मी तुमची अस्वस्थता, राग आणि अपेक्षा समजू शकतो…”
“माझ्या मते, विद्यार्थी हा समाजाचा खरा आवाज आहे. त्यात कोणताही स्वार्थ नाही, त्यात केवळ भविष्याची चिंता आहे. त्यात हक्कांची मागणी आहे. देशाला अधिक चांगलं बनवण्याचं स्वप्नही आहेत. म्हणूनच मी मनापासून तुमच्यासोबत आहे…”
“पण मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा बाहेरचे लोक तुमच्या चळवळीत घुसखोरी करू लागतात. राजकीय अजेंडा घेऊन संधी साधतात, त्यांचा स्वतःचा अजेंडा असतो, त्यांच्यापासून सावध रहा. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की, जितके जास्त लोक सामील होतील, तितकी जास्त ताकद तुम्हाला मिळेल. पण नेहमीच तसं नसतं. अनेकदा, तेच लोक तुमच्या कमकुवतपणाचं कारण बनतात. ते तुमचा आवाज बनत नाहीत, उलट तुमचा फायदा उचलतात…”, असं अनुपम खेर म्हणाले आहेत.
दरम्यान, देशाला धडकी भरवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन छेडलं आहे. आता हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटी समोर आले आहेत. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत.
अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा, आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत. तर, रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर, सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त होत, विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :