Salman Khan Paper leak Video Viral: ‘सलमान लीक पेपर देऊन झालाय पास ‘ जंतरमंतर आंदोलनावरून सलमान खानचं ट्वीट येताच जूना VIDEO व्हायरल


Salman Khan on NEET Paper leak old Video Viral: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ( Salman Khan) दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय.  ‘देशातील मुले एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला’ असं सलमान खानने X पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, हे आंदोलन ‘जेन झी’ तरुणांचे आहे, इथे मिम्स तर बनणारच.’ असं त्याने म्हटलं. दरम्यान, सलमानचे वडील सलिम खान यांनी कॉमेडीयन कपील शर्मा यांच्या कार्यक्रमात सांगितलेला बोर्डाच्या परिक्षेचा किस्सा आता सध्या तुफान व्हायरल होतोय.

सलमानने दिलेला लीक झालेला पेपर..

नीट पेपर फुटीचा आणि सलमान खानच्या ट्विट नंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यात सलीम खान म्हणताना दिसतायेत, ‘माझ्या घरी एक माणूस यायचा. मी तेंव्हा कामात खूप व्यस्त असायचो, पण हा माणूस घरी आला की सलमान, अरबाज, सोहेल आणि माझी बायको सगळे गणेश आला गणेश आला म्हणत त्याला खाऊ पिऊ घालायची. मला प्रश्न पडला, हा व्यक्ती कोण आहे,ज्याला माझ्या घरात माझ्यापेक्षा जास्त इज्जत ह्याला मिळू लागली आहे. मला वाटलं ही माहिती तर घेतलीच पाहिजे, हा गणेश कोण आहे? नंतर मला कळालं की त्यावेळी परिक्षांचा पेपर लिक व्हायचा, तो गणेश ह्यांना लिक झालेला पेपर आणून द्यायचा. सलीम खान असं म्हणताच संपूर्ण शो मध्ये सगळेजण जोरदार हसायला लागले. मात्र, नंतर सलमानने मान्य केला की, तो लिक पेपर माझ्यासाठी होता. ह्यामुळे ट्विटद्वारे सलमान खान याने शिक्षण प्रणाली आणि पेपर लीक बद्दल केलेल्या वक्तव्याला आता कॉमेडी ट्रोलींगची किनार लाभली आहे.

 

‘..तर भारत ‘एज्युकेशन हब’ बनेल’ – सलमान खान

‘ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती; तिला हिंसक वळण लागले याचे खूप दुःख वाटते. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते. प्रश्नपत्रिका फुटणे (पेपर लीक) ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील मुले एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला.

त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करून स्वतःचे भविष्य घडवण्याची तसेच एक महान व सुशिक्षित भारत निर्माण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. ते खरोखरच धैर्यवान आणि शूर आहेत. शिक्षणाप्रती असलेली ही ओढ आणि प्रेरणा पाहता, ही पिढी भारताचा नक्कीच गौरव वाढवेल.

हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातील आहे; याचे राजकारण केले जाऊ नये. याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिले पाहिजे. मला खात्री आहे की सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. ही सर्वांसाठीच फायदेशीर अशी स्थिती आहे. सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर ईश्वराची कृपा असो.शिक्षण हीच पुढची ‘ट्रेंड’ आणि ‘फॅशन’ बनली पाहिजे आणि ती दरवर्षी अधिक लोकप्रिय व आकर्षक झाली पाहिजे; इतकी की परदेशातून लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि भारत एक ‘एज्युकेशनल हब’ (शिक्षणाचे प्रमुख केंद्र) बनेल.’ असं तो म्हणाला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *