खून कसा करायचा, पुरावे कसे मिटवायचे? AI कडून केला फुल प्रुफ प्लान, ट्रिपल मर्डर प्रकरणाला धक्कादायक वळण | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

बंगळुरूच्या ट्रिपल मर्डर प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. या केसमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वापराबाबत पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे.

खून कसा करायचा, पुरावे कसे मिटवायचे? AI कडून केला फुल प्रुफ प्लान, ट्रिपल मर्डर प्रकरणाला धक्कादायक वळण
खून कसा करायचा, पुरावे कसे मिटवायचे? AI कडून केला फुल प्रुफ प्लान, ट्रिपल मर्डर प्रकरणाला धक्कादायक वळण

बंगळुरू : बंगळुरूच्या ट्रिपल मर्डर प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. या केसमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वापराबाबत पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे. मुख्य आरोपी केनेथने हत्या करण्याआधी गुगलचं एआय जेमिनीची मदत घेतली आणि हत्या कशी करायची आणि पुरावे कसे मिटवायचे? याचा शोध घेतला.

जूनमध्ये केआर पूरम भागातील एका अपार्टमेंटमध्ये 55 वर्षांची व्यक्ती, त्याची 48 वर्षांची पत्नी आणि 20 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. सुरूवातीला पोलिसांना मृत दाम्पत्याची मोठी मुलगी श्वेता आणि तिचा लिव्ह इन पार्टनर केनेथ याच्यावर संशय आला, कारण दोघंही घटनेनंतर तिथून फरार झाले होते. पण नंतर पुदुच्चेरीमधून दोघांना अटक करण्यात आली.

AI ची मदत घेतली

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केनेथने AI ला हत्या कशी करायची आणि पुरावे कसे मिटवायचे? हे थेट विचारलं नाही. त्याऐवजी त्याने अप्रत्यक्ष प्रश्न विचारले ज्यामुळे माहिती मिळू शकेल. घरात चोर शिरला तर त्याचा सामना कसा करायचा? कोणत्या हत्याराचा वापर करायचा? घुसखोरावर हल्ला करण्याची सगळ्यात प्रभावी पद्धत कोणती? असे प्रश्न त्याने AI ला विचारले. तसंच एखाद्या व्यक्तीला असहाय्य करून त्याच्यावर चाकू हल्ल्याबाबतची माहितीही त्याने AI कडून मिळवण्याचा प्रयत्न केला, असंही तपासात समोर आलं आहे.

भट्टीमध्ये मृतदेह टाकण्याची योजना

केनेथने क्लाऊड किचन सुरू करण्यासाठी आधीच एक लोखंडाची भट्टी विकत घेतली होती. मृतदेहांची विल्हेवाट तो याच भट्टीमध्ये लावणार होता, पण नंतर हे करणं शक्य नसल्याचं त्याला जाणवलं आणि मग त्याने हा प्लान सोडून दिला. तिघांची हत्या करण्याचा कट पूर्ण तयारी करून झाला, केनेथ बऱ्याच काळापासून याचं प्लानिंग करत होता. केनेथ अनेकदा श्वेतासमोर याबाबत बोलला होता, पण श्वेताला सुरूवातीला तो मस्करी करतोय, असं वाटलं त्यामुळे तिने केनेथचं बोलणं गांभिर्याने घेतलं नाही.

पैशांवरून वाद

या ट्रिपल मर्डरच्या मागे आर्थिक कारण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. श्वेताचे आई-वडील जिवंत राहिले नाहीत तर त्याच्याकडे होणारी पैशांची मागणी बंद होईल आणि श्वेताही कुटुंबाच्या आर्थिक दबावातून मुक्त होईल, त्यामुळे केनेथने त्यांची हत्या करण्याचा कट रचला.

मराठी बातम्या/देश/

खून कसा करायचा, पुरावे कसे मिटवायचे? AI कडून केला फुल प्रुफ प्लान, ट्रिपल मर्डर प्रकरणाला धक्कादायक वळण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *