नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यंदा लक्षवेधी ठरली होती, चंद्रपूरची (chandrapur) महापालिका. चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या निकालाच काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, येथील दोन नेत्यांच्या मतभेदामुळे काँग्रेसला विरोधी पक्षात बसावं लागलं. मात्र, अद्यापही येथील दोन्ही नेत्यांचा वाद सुरूच असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांचे दोन गट पडल्याने हा वाद आयुक्तांपर्यंत गेला होता. अखेर आज चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या (Congress) गटनेतेपदाचा वाद निकाली निघाला आहे.
विजय वडेट्टीवार गटाचे राजेश अडुर यांची गटनेतेपदाची नोंद रद्द करण्यात आली तर प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेतील 16 नगरसेवकांच्या बहुमताने गटनेते बदलाचा केलेला ठराव वैध ठरवण्यात आला आहे. गटनेते बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या परवानगीची सक्ती नसल्याचं मत विभागीय आयुक्त यांनी निकाल देतेवेळी म्हटलं. लोकशाहीत नेता निवडला जातो, ‘थोपवला’ जात नाही, असेही निरीक्षण आदेशात नोंदवण्यात आले आहे.
27 जुलै रोजी गटनेतेपदी होणार निवड
नगरपरिषद/महापालिका नियमांत गटनेते बदलास बंदी नाही, गटनेते बदलाचा निर्णय बहुमताने झाल्यास तो ग्राह्य धरता येईल. यात नागपूर खंडपीठाचा हायकोर्टाच्या निरीक्षणांचा संदर्भ विभागीय आयुक्तांच्या आदेशात देण्यात आला आहे. त्यानुसार, 27 जुलै 2026 रोजी खासदार धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी आदेशात दिले आहेत.
मी सर्वांना सोबत घेऊन समस्या लोकांच्या सोडवेल
दरम्यान, मी गटनेता झालो असलो तरी काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांना सोबत घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया धानोरकर गटाचे नेते तथा काँग्रेस गटनेते सुरेंद्र अडबाले यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर दिली आहे.
हेही वाचा
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर