Colors Marathi:कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका मी जिंकून घेईन सारं’ (MI JInkun Ghein Sara) मध्ये सध्या अतिशय रंजक वळण आले असून, मालिकेत आता एक नवीन आणि मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. शांभवीच्या कारस्थानांचा पर्दाफाश करण्यासाठी छवीने कंबर कसली आहे, तर यादरम्यान अनिकेतची तिला खंबीर साथ लाभणार आहे. छवीला शांभवीच्या खोलीत गुप्त फाईल मिळते. छवी अनिकेतला सर्व पुरावे दाखवणार आहे. अनिकेतला छवीच्या संशयावर विश्वास बसतो. दोघे मिळून शांभवीविरुद्ध लढायचं ठरवतात.. राजगुरू कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आणि शांभवीचे कावे हाणून पाडण्यासाठी छवी आणि अनिकेत आता एकाच टीमने मैदानात उतरले आहेत.
मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त नाट्य आणि खळबळजनक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला अनिकेत आणि छवी मनमोकळेपणाने संवाद साधत मैत्रीचे नवे नाते जुळवण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे शांभवी गैरसमज पसरवून आणि बाईआजींच्या औषधांमध्ये फेरफार करून मोठा खेळ रचते. छवी शांभवीला रंगेहात पकडून एका महिन्यात सत्य बाहेर आणण्याची शपथ घेते आणि बाई आजींच्या औषधांची जबाबदारी स्वतःच्या हातात घेते. मात्र, शांभवीच्या कुटिल कारस्थानांमुळे आणि आश्रमातील बनावट देणगीच्या सत्याचा शोध घेत असतानाच महत्त्वाचा साक्षीदार पळून जातो, ज्यामुळे छवीची पहिली चाल फसत असून शांभवी वरचढ ठरणार आहे.
राजगुरू कुटुंबाचा हा मान व अभिमान टिकवण्यासाठी छवी आणि अनिकेत कोणकोणती पावले उचलणार? शांभवीचे हे जाळे तोडण्यात त्यांना यश येईल का? प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे हे रहस्य आणि रोमांचक वळणे लवकरच मालिकेत उलगडणार आहेत.पहा मी जिंकून घेईन सारं दररोज संध्या. 7. वा. आपल्या कलर्स मराठीवर.