Guru Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीमध्ये होणाऱ्या बदलाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या आयुष्यावर पडतो. येणार्या काही दिवसांत ग्रहांच्या चालीरीतीत महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. ज्याचा सरळ प्रभाव काही राशींच्या आयुष्यावर पडणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, देवगुरु बृहस्पती ग्रह लवकरच आपली चाल बदलताना बुधच्या स्वामित्व असलेल्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 19 ऑगस्ट रोजी गुरु ग्रह बुध ग्रहाच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, ज्याचा प्रभाव ऑक्टोबरच्या शेवटी म्हणजेच दीड महिन्यापर्यंत सुरु राहील. या संक्रमणापासून कोणत्या राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत आणि जीवनातल्या खडतर प्रवासापासून सुटका होईल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
‘या’ 4 राशीच्या जीवनात येईल सुख आणि शांती
1. मिथुन रास (Gemini Horoscope)
गुरु ग्रहाच नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन उमेद आणि यश घेऊन येणार आहे. या वेळात तुमची थांबलेली कामे आणि लवकरच पूर्ण होतील जे खुप दिवसा पासून अडकलेली आहेत. नोकरी करणार्या लोकांना कामात मोठी जवाबदारी दिली जाऊ शकते, ज्याच्यामुळे तुमच्या कामाला नवीन दिशा मिळेल. तसेच, व्यवसायिक लोकांना काही नवीन गोष्टी हाती लागू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
2. कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. यादरम्यान तुमच्या खुप काळ्याच्या मेहनतीला अखेरीस यश भेटेल. तुमच्या कामाचे कौतुक कार्यालयात सगळीकडे होईल. ज्येष्ठ अधिकार्याचा पूर्ण सहयोग मिळेल. जे तरुण युवा खूप काळापासून कामाच्या शोधात आहेत, त्यांना या काळात खूप मोठी बातमी ऐकायला मिळेल. व्यावसायिकांसाठीही मोठ्या नफ्याचे योग आहेत.
3. तूळ रास (Libra Horoscope)
तुला राशीच्या लोकांसाठी गोचर सुख घेऊन येऊ शकतो. काही काळापासून आर्थिक गोष्टींवर तुम्ही अवघड गोष्टींचा सामना करत होता, ते आता हळुहळू कमी होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय करणार असाल, तर हा काळ तुमच्या फेवर मध्ये असेल. परिवाराचा भरपूर सपोर्ट मिळणार असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या कामावर पण दिसून येईल.
4. मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोक पण गुरुच्या या नक्षत्र परिवर्तन च्या नंतर मोकळा श्वास घेऊ शकतील. हा काळ तुमच्या आयुष्यात प्रगतीची नवीन दारे उघडतील. नोकरीत प्रमोशन किंवा उत्कृष्ट काही हाती लागू शकते. व्यवसायात काही अप्रतिम नफा हाती लागू शकतो. जर, तुमचे धन खुप काळापासून अडकलेला असेल, तर त्याचे पण परत भेटण्याचे योग आहे. यादरम्यान तुमचा योग्य निर्णय लाभदायक ठरू शकतो.
गुरुच्या राशीबदलासाठी ‘हे’ उपाय करा
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरु आणि बुधच्या नक्षत्राचा मेळा असतो, तो ज्ञान, वाणी आणि व्यापार मध्ये विशेष लाभ घेण्यासाठी व्यवसायात साधारण लाभ मिळवण्यासाठी काही विशिष्ट उपाय योजनांचा अवलंब केल्यास, ग्रहांच्या गोचराचे परिणाम अनेक पटींनी वाढत जातात.
भगवान विष्णूची उपासना : भगवान विष्णूंची नियमित पूजा करा आणि त्यांना पिवळी फुले अर्पण करा. यामुळे गुरू ग्रहाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
पिवळ्या रंगाची वस्त्रे आणि वस्तूंचा वापर : या विशिष्ट काळात शक्य तितके पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. तसेच, गुरूवारी गरजू लोकांना पिवळी डाळ, चणा डाळ, पिवळी फळे (विशेषतः केळी) आणि हळद यांचे दान करा.
मंत्र जाप :
देव गुरु बृहस्पतीचे बीज मंत्र ‘ॐ बृं बृहस्पतये नमः’ हा मंत्र रूद्राक्षाच्या माळानी मनोभावे जप करा.
बुधला मजबूत करण्याचा उपाय :
गुरु ग्रहाच्या गोचर मुळे अश्लेषा नक्षत्र म्हणजे बुधच्या नक्षत्रामध्ये प्रवेश कतर आहे. त्यामुळे, बुध ग्रहाला बळकट करणेही महत्त्वाचे आहे. यासाठी गाईला नियमितपणे हिरवा चारा खाऊ घाला.
वाणीची शुद्धता आणि संयम :
याच दरम्यान आपल्या वाणी मध्ये गोडवा ठेवा. चुकून सुधा कोणाचे पण मन दुखवू नका, याचे कारण असे की, वाणी आणि बुद्धीचा कारक असलेल्या बुध ग्रहाच्या नक्षत्रात होणार्या या गोचर काळात, तुमच्या बोलण्याच्या गोड पद्धतीमुळे तुमची रखडलेली कामेही मार्गी लागण्यास मदत होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Dwidwadash Drushti Yog 2026 : आज जुळून येणार दुर्लभ द्विद्वादश योग; 4 राशींच्या पदरात पडणार पुण्य, सुवर्णकाळाचा अवधी अवघ्या काही तासांतच सुरु…