Numerology : पैशांनी नाही पण मनाने श्रीमंत असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक; मदतीसाठी नेहमी असतात तत्पर, तुमची जन्मतारीख कोणती?


Numerology : अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी त्याला त्याची रास विचारतो. मात्र, अंकज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन निघालेल्या मूलांकावरुन (Mulank) त्या व्यक्तीचा खरा स्वभाव, त्याची विचारशैली आणि विचारसरणी यांचा अंदाज लावता येतो. 

अंकज्योतिष शास्त्रात, काही खास अंकांनी प्रभावित असलेले लोक हे मनाने फार प्रेमळ, दयाळू आणि मोठ्या मनाचे असतात. या जन्मतारखेच्या लोकांना इतरांचं दु:ख पाहवत नाही, तसेच, हे लोक मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. इतरांचं सुख हेच या जन्मतारखेच्या लोकांना महत्त्वाचं वाटतं. अंकज्योतिष शास्त्रात अशा कोणत्या जन्मतारखा आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

मूलांक 2 – फार संवेदनशील असतात

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 2 असतो. या जन्मतारखेचा संबंध चंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक फार संवेदनशील मनाचे असतात. समोरच्या व्यक्तीच्या मनातील दु:ख यांना फार लवकर कळतं. अनेकदा यांच्याकडून समोरुन मदतीचा हात पुढे येतो. 

मूलांक 6 – मोठ्या मनाचे असतात

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडण्यात आला आहे. या जन्मतारखेचे लोक मनमिळाऊ, आकर्षक आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणारे असतात. इतरांना मदत करण्यासाठी हे नेहमी तत्पर असतात. 

मूलांक 9 – इतरांसाठी काहीही करायला तयार असतात

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 9 असतो. या मूलांकाचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडण्यात आला आहे. या जन्मतारखेचे लोक साहसी आणि उत्साही स्वभावाचे असतात. यांच्यात फार धैर्य असतात. तसेच, या लोकांचे पटकन मित्रदेखील होतात. 

मूलांक 3 – मदतीसाठी नेहमी तत्पर असतात 

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 3 असतो. या जन्मतारखेच्या लोकांचा संबंध थेट गुरु गरहाशी जोडण्यात आला आहे. तसेच, या जन्मतारखेचे लोक फार सकारात्मक विचारसरणीचे असतात. मार्गदर्शन करणारे असतात. तसेच, समजूतदार विचाराचे असतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                

Dwidwadash Drushti Yog 2026 : आज जुळून येणार दुर्लभ द्विद्वादश योग; 4 राशींच्या पदरात पडणार पुण्य, सुवर्णकाळाचा अवधी अवघ्या काही तासांतच सुरु…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *