Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2027) आपला संभाव्य 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलला (Shubhman Gill) कर्णधार म्हणून निवडले आहे . या संघात अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये शुभमन गिलसह रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचासमावेश आहे.
शास्त्री यांनी शुभमन गिल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना त्यांच्या अनुभवामुळे संघात स्थान दिले आहे. सलामीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर मधल्या फळीत श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच इंग्लंड दौऱ्यावर विकेटकीपर म्हणून खेळलेल्या ईशान किशनला शास्त्री यांनी आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
रवी शास्त्री यांनी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ- (Ravi Shastri Picks His India Squad for the ODI World Cup 2027)
फलंदाजांची यादी: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल
अष्टपैलू खेळाडूंची यादी: हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा
यष्टिरक्षक: ऋषभ पंत
गोलंदाजांची यादी: जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल- (ICC ODI World Cup 2027)
आयसीसीने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल केला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये ऑक्टोबर 2027 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 14 संघ सहभागी होणार असून, ‘सुपर-7’ टप्पा जोडण्यात आला आहे. या नवीन रचनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन फॉरमॅटमध्ये 14 संघांना प्रत्येकी 7 च्या दोन गटात विभागले जाईल. साखळी फेरीत (Group Stage) प्रत्येक संघ 6 सामने खेळेल आणि त्यातून तळाचे दोन संघ बाहेर पडतील. दोन्ही गटांतील अव्वल 3 संघ पुढे ‘सुपर-7’ टप्प्यात प्रवेश करतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल सामने खेळवले जातील. ही स्पर्धा 4 ऑक्टोबर 2027 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा: