Kaylee Hottle Death: सिनेसृष्टी गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 18 व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा


Kaylee Hottle Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं (Famous Actress) वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी निधन झालं आहे. एक गंभीर रस्ते अपघातात (Road Accident) अभिनेत्रीनं अखेरचा श्वास घेतल्याचं सांगितलं जात आहे. ‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ (Godzilla vs. Kong) आणि ‘गॉडजिला एक्स कॉन्ग: द न्यू एम्पायर’मध्ये (Godzilla x Kong: The New Empire) जियाची लक्षात राहणारी भूमिका साकरणारी अमेरिकन अभिनेत्री केली हॉटल (Kaylee Hottle) हिनं वयाच्या अवघ्या 18 वर्षांतच जगाला अलविदा म्हटलं. 

अमेरिकनं मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेरीलँडमध्ये एका रस्ते अपघातात केली हॉटल गंभीर जखमी झाली आणि रुग्णालयात नेत असतानाच तिनं अखेरचा श्वास घेतला. तिचे वडील, जोशुआ हॉटल यांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला. केली तिच्या प्रभावी अभिनयासाठी आणि हॉलिवूडमध्ये कर्णबधिर कलाकारांच्या प्रतिनिधित्वाचा खंबीरपणे पुरस्कार करणारी कलाकार म्हणून ओळखली जात असे. तिच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टी आणि कर्णबधिर समुदायात शोककळा पसरली आहे.

केली हॉटलचा जन्म 2007 मध्ये जॉर्जियामध्ये झालेला आणि त्यानंतर तिचं कुटुंब टेक्सासमध्ये आलं आणि तिथेच तिचं लहानपण गेलं. केली अशा कुटुंबातून आलेली, जिथल्या अनेक पिढ्यांमध्ये कर्णबधीर होत्या. अमेरिकन साइन लँग्वेज (ASL) वर असलेल्या तिच्या मजबूत पकडीमुळे तिला लहान वयातच जाहिरातींमध्ये काम मिळालं. 2021 मध्ये तिनं ‘Godzilla vs. Kong’मधून मोठ्या पडद्यावर डेब्यू केला.  या सिनेमात तिनं ‘जिया’ नावाच्या एका मूक-बधिर मुलीची भूमिका साकारली होती, जिचं किंग कॉन्गसोबत भावनिक नातं होतं. तिच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांनीही खूप कौतुक केलेलं.

त्यानंतर केलीनं 2024 मध्ये रिलीज झालेल्या ‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’: द न्यू एम्पायर’मध्येही जियाची भूमिका पुन्हा साकारली. याव्यतिरिक्त तिनं टीव्ही सीरिज ‘Magnum P.I.’मध्येही काम केलेलं. कित्येक मुलाखतींमध्ये तिनं म्हटलेलं की, फिल्म्स आणि टीव्हीमध्ये वास्तववादी भूमिका साकारण्याची संधी कर्णबधिर कलाकारांना अधिक प्रमाणात मिळायला हवी. तिच्या निधनामुळे हॉलिवूडनं अत्यंत तरुण वयातील एक उदयोन्मुख प्रतिभावान अभिनेत्री गमावली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, ‘रिकव्हरीचा काळ खूप कठीण…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *