कधी लॉज तर कधी फ्लॅट, पुण्यात 20 वर्षीय तरुणीवर चौघांकडून वारंवार अत्याचार, प्रियकरानेच केलं मित्रांच्या हवाली | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २० वर्षीय तरुणीवर चार जणांनी वारंवार अत्याचार केला आहे.

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो

पुणे: पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २० वर्षीय तरुणीवर चार जणांनी वारंवार अत्याचार केला आहे. एका आरोपीनं पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर मुख्य आरोपीने आपल्या आणखी तीन मित्रांनाही पीडित तरुणीवर अत्याचार करण्यास पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. फरहान रिझवान शेख (वय २०), फजल शेख (वय २०), रेहान रिझवान शेख (वय १८) आणि साहिल (वय २०) असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. चारही आरोपी पुण्याच्या विमाननगर परिसरातील रहिवासी आहेत. आरोपींनी पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत विविध लॉज आणि फ्लॅटवर घेऊन जात अत्याचार केल्याचा आरोप आहे.

लग्नाचे आमिष दाखवून विश्वासघात

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणीची ओळख फरहान रिझवान शेख याच्याशी झाली होती. हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. या नात्याचा गैरफायदा घेत फरहानने तरुणीला प्रेमाच्या आणि लग्नाच्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२५ ते ३ जून २०२६ या कालावधीत त्याने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

मित्रांकडूनही अत्याचार अन् अश्लील व्हिडिओची धमकी

मुख्य आरोपी फरहान एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या इतर तीन मित्रांनाही पीडितेवर अत्याचार करण्यासाठी पाठवले. या दरम्यान आरोपींनी पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू ठेवला. अखेर या अत्याचाराला कंटाळून तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली.

वाघोली पोलिसांकडून चौघांना अटक

पीडितेच्या तक्रारीवरून वाघोली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध बलात्कार, धमकी देणे आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत. एका २० वर्षीय तरुणीवर अशाप्रकारे चार जणांनी अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/

कधी लॉज तर कधी फ्लॅट, पुण्यात 20 वर्षीय तरुणीवर चौघांकडून वारंवार अत्याचार, प्रियकरानेच केलं मित्रांच्या हवाली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *