Ruturaj Gaikwad : टीम इंडियाबाहेर असलेल्या ऋतुराजला कॅप्टन्सी, स्टार्सनी भरलेल्या टीममध्ये मुंबईचा उपकर्णधार! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला. या पराभवाला 24 तास होत नाहीत तोच ऋतुराज गायकवाड याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टीम इंडियाबाहेर असलेल्या ऋतुराजला कॅप्टन्सी, स्टार्सनी भरलेल्या टीममध्ये मुंबईचा उपकर्णधार!
टीम इंडियाबाहेर असलेल्या ऋतुराजला कॅप्टन्सी, स्टार्सनी भरलेल्या टीममध्ये मुंबईचा उपकर्णधार!

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला. या पराभवाला 24 तास होत नाहीत तोच ऋतुराज गायकवाड याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी आगामी दुलीप ट्रॉफी 2026 साठी वेस्ट झोनच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. मागच्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या ऋतुराज गायकवाडला वेस्ट झोनची कॅप्टन्सी देण्यात आली आहे. तर मुंबईचा डावखुरा ऑलराऊंडर शम्स मुलानी याला उपकर्णधार करण्यात आलं आहे.

झोनल सिलेक्शन कमिटीच्या बैठकीनंतर वेस्ट झोनच्या टीमची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. मागच्या वर्षी दुलीप ट्रॉफीमध्ये शार्दुल ठाकूर वेस्ट झोनचा कर्णधार होता. शार्दुलच्या नेतृत्वात वेस्ट झोनची टीम सेमी फायनलला पोहोचली होती. यावेळी शार्दुल कर्णधार नसला तरी तो टीममध्ये आहे.

ऋतुराज गायकवाड हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधारही आहे. आता दुलीप ट्रॉफीमध्ये ऋतुराज वेस्ट झोनची कॅप्टन्सी कशी करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वेस्ट झोनच्या टीममध्ये 6 खेळाडू राखीव ठेवणयात आले आहेत.

स्टारनी भरलेली टीम

वेस्ट झोनच्या टीममध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत, ज्यात पृथ्वी शॉ, सरफराज खान, मुशीर खान आणि उर्विल पटेल यांचा समावेश आहे. याशिवाय हार्विक देसाई याला विकेट कीपर म्हणून संधी मिळाली आहे. तर बॉलिंगमध्ये शम्स मुलानी, तनुष कोटियन आणि सिद्धार्थ देसाई हे स्पिनर असतील. फास्ट बॉलिंगची जबाबदारी शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांच्यावर असेल.

वेस्ट झोनची टीम

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शम्स मुलानी, हार्विक देसाई, उर्विल पटेल, जयमीत पटेल, पृथ्वी शॉ, शिवालिक शर्मा, सिद्धार्थ देसाई, सरफराज खान, मुशीर खान, अतीत शेठ, मुकेश चौधरी, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे

राखीव खेळाडू – जय गोहिल, आर्या देसाई, अर्शिन कुलकर्णी, महेश पिठिया, विशाल जयस्वाल, राजवर्धन हंगर्गेकर

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

Ruturaj Gaikwad : टीम इंडियाबाहेर असलेल्या ऋतुराजला कॅप्टन्सी, स्टार्सनी भरलेल्या टीममध्ये मुंबईचा उपकर्णधार!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *