Hindu Dharam : सनातन परंपरा आणि पौराणिक ग्रंथांनुसार, भगवद्गीतेत आणि भगवान विष्णु पुराणात चार युगांचं वर्णन करण्यात आलं आहे. यामध्ये कलयुगाला सर्वात अंतिम काळ मानण्यात आला आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषी मुनींनी कलयुगाच्या सीमेपर्यंत पोहोचण्याच्या संदर्भात काही आश्चर्यकारक भविष्यवाणी केली होती.
पौराणिक ग्रंथांनुसार, कलयुग हे केवळ काळाचं चक्र नाही तर मानवी जीवन, धर्म आणि प्रकृतीचे काही मार्ग आहेत. कलयुगाच्याच संदर्भात आजकाल अनेक भविष्यवाणींवर बोललं जात आहे. ही भविष्यवाणी जवळपास 500 वर्षांपूर्वी लिहीण्यात आली होती. ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे, कलयुगाचा शेवट झाल्यानंतर, मोठा विनाश होणार आहे. त्यानंतर एका नवीन युगाची सुरुवात होणार आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
काय होणार कलयुगाच्या शेवटी?
भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे, ठराविक वेळेनुसार, पृथ्वीवर काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. जसजसा कलयुगाचा अंत होईल आपल्या प्रकृतीत बदल आणि अनेक समस्या वाढू शकतात.
हिंदू पौराणिक ग्रंथांनुसार, कलियुगाच्या शेवटी पापांचा अतिरेक होईल, मानवी आयुष्य कमी होऊन केवळ १३ वर्षांवर येईल आणि संपूर्ण विनाश घडवून आणण्यासाठी भगवान विष्णू कल्की अवतार घेतील。 या महाप्रलयानंतर कलियुगाचा अंत होऊन पुन्हा एका नव्या सत्ययुगाची सुरुवात होईल
नैतिकतेचा ऱ्हास : माणुसकी पूर्णपणे नष्ट होईल. लोक पैशासाठी स्वतःच्या नातेवाईकांना आणि मित्रांना मारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. खोटेपणा आणि फसवणूक हेच यशाचे गमक मानले जाईल.
निसर्गाचा प्रकोप : नद्या आटून जातील, पाऊस अनियमित होईल. कलियुगाच्या शेवटी सतत अनेक वर्षे मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे सर्वत्र महापूर येईल आणि समस्त पृथ्वी जलमय होईल. त्यानंतर सूर्य अतिशय प्रखर होईल आणि संपूर्ण पृथ्वी सुकून जाईल.
भयानक रात्र : विष्णू पुराणात सांगितल्यानुसार, कलियुगाच्या अंतिम टप्प्यात अंधार वाढेल आणि शेवटची रात्र खूप मोठी असेल, जिथे एका रात्रीचा कालावधी एका वर्षासारखा वाटेल.
कल्की अवतार : जेव्हा पृथ्वीवर पापाचा घडा भरेल, तेव्हा भगवान विष्णू ‘कल्की’ रूपात अवतरतील. ते सर्व दुष्टांचा नाश करतील आणि काळाची पुनर्रचना करून पुन्हा सतयुगाची स्थापना करतील.
कलियुगात केदारनाथ धामची यात्रा अत्यंत फलदायी मानली जाते. पुराणांनुसार, या काळात पाप आणि दुःख वाढतात, अशा वेळी केदारनाथ आणि इतर चार धामांचे दर्शन घेतल्याने मानवाला सर्व पापांतून मुक्ती मिळते. आदि शंकराचार्यांनी स्थापित केलेले हे मंदिर कलयुगातील मानवांसाठी मोक्षाचे द्वार मानले जाते.
असं म्हणतात की, जेव्हा अधर्म वाढेल आणि प्रकृती असंतुलित होईल तेव्हा प्राचीन मंदिर आणि देवस्थान एकतर नष्ट होतील किंवा अस्तित्वाच्या धोक्यात येतील. यामागे पृथ्वीचं वाढतं तापमान आणि प्राकृतिक परिवर्तन हे कारणीभूत ठरतील. भविष्यवाणीनुसार, कलयुगात ज्या लोकांना धर्माचं, शास्त्राचं ज्ञान नाहीये अशा लोकांचाही बोलबालाही वाढू शकतो. लोकांच्या श्रद्धेचा फायदा उचलला जाऊ शकतो. अधर्म पसरु शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत ‘या’ 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा