Bishnoi Gang Targets Aamir Khan: ‘स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही…’; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी


Bishnoi Gang Targets Aamir Khan: बॉलिवूड (Bollywood News) सुपरस्टार सलमान खान आणि लॉरेंस बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi Gang) यांच्यातलं वैर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगच्या (Bishnoi Gang) रडारवर बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) आला. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली. त्यानंतर शाहरुख खानच्याही (Shah Rukh Khan) सुरक्षेत वाढ करण्यात आलेली. अशातच आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) देखील बिश्नोई गँगच्या रडारवर आलाय. आमिर खानला बिश्नोई गँगच्या नावानं धमकी देण्यात आलीय. त्यामुळे अख्ख्या इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. 

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी यांच्यात दीर्घकाळापासूनचं कटू वैर चालत आलंय. आता सलमान खाननंतर, लॉरेन्स बिश्नोई टोळीचं पुढचं लक्ष्य आमीर खान आहे का? असा  प्रश्न उपस्थित होत आहे. आमीर खानबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आल्यानं असा प्रश्न उपस्थित होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमीर खान यांना आता सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे मनोरंजन क्षेत्रात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावरील एक पोस्ट आणि सध्या व्हायरल होत असलेल्या एका कथित ऑडीओ क्लिपमध्ये, ‘टायसन बिश्नोई’ नावाच्या व्यक्तीनं दावा केलाय की, आमिर खान आता त्यांच्या ‘हिट लिस्ट’वर आहे. या व्हायरल पोस्टद्वारे आमिर खानला थेट इशाराही देण्यात आलाय. ही पोस्ट आणि त्याशी संबंधित ऑडिओ ऑनलाइन वेगाने पसरल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

धमकीचं कारण ‘लव्ह जिहाद’

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये आमिर खानला देण्यात आलेल्या धमकीच्या कारणाचा उल्लेख करण्यात आलाय. यात आमीर खान यांच्यावर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आला असून, बिश्नोई टोळीशी संबंधित हँडलनं त्यांना लक्ष्य करण्याची घोषणा करण्यामागे हेच कारण असल्याचं म्हटलं आहे.

पोस्टमध्ये नेमकं म्हटलंय काय?

जय श्री राम. 
जय सीता राम. 

मी आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई गँग) बोलत आहोत. आमिर खानसारखे लोक आपल्या देशात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहेत, जी गोष्ट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही या कुत्र्याला खपवून घेणार नाही आणि त्याला लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल. ही प्रथा आपल्या सनातन धर्माच्या आणि राष्ट्राच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या बंधू-भगिनींना आणि देशवासियांना वचन देतो की, जो कोणी या घृणास्पद कृत्याला प्रोत्साहन देईल, त्याला आमच्या शैलीत उत्तर दिले जाईल. जे लोक स्टारडमच्या आडून या गोष्टीला प्रोत्साहन देत आहेत, त्यांचा आम्ही खात्मा करू.

शिवाय, राजस्थानमधील श्री गंगानगर येथे एका निष्पाप मुलीवर झालेल्या त्या घृणास्पद कृत्याबाबत सांगायचं तर, प्रशासनानं जरी उत्कृष्ट कामगिरी केली असली, तरी काही राजकीय व्यक्ती गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. हा आमचा पहिला आणि अंतिम इशारा समजावा, त्या निष्पाप मुलीसोबत जे घडलं त्यात ज्यांचा थोडासाही सहभाग असेल, मग ते कायद्याच्या कचाट्यातून सुटलेले का असेनात, त्यांना आमच्याकडून नक्कीच शिक्षा भोगावी लागेल. जे राजकारणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी यात हस्तक्षेप करणे त्वरित थांबवावं, अन्यथा, त्यांची जी अवस्था होणार आहे, तीच तुमचीही होईल. थोडी माणुसकी दाखवा.

हुतात्मा झालेले आमचे दोन बंधू, परवेश आणि हिमांशू… तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहाल आणि आम्ही तुमचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही शत्रूला चोख प्रत्युत्तर देऊ. ईश्वर तुमच्या दोघांच्याही आत्म्यास शांती देवो.

जय श्रीराम…

पाहा व्हिडीओ : Aamir Khan Threat Call: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: ‘फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही…’; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *