Bollywood Actress on Sonam Wangchuk: ‘सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर’; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..


Bollywood Actress on Sonam Wangchuk: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan)यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक जंतरमंतरला गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावत असल्याने देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.  दरम्यान आंदोलन स्थळावरून सोनम वांगचुक यांना पोलिसांनी हटवलं. जंतर मंतरला जमलेले आंदोलन आक्रमक झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केलीय. नीट पेपर फुटी मुळे झालेला गोंधळ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावरून अनेक जण सोनम वांगचुक यांना पाठिंबा देताना दिसतात. अनेक बॉलीवूड तसेच मराठी सेलिब्रेटींनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सपोर्ट केलाय. बॉलीवूड अभिनेत्री श्वेता तिवारीच्या (Shweta Tiwari) वक्तव्याची चर्चा असून तिने सोनम वांगचुक यांना पाठिंबा देताना कॉकरोच जनता पार्टीला विरोध केलाय. कॉकरोच जनता पार्टी सोनम वांगचुक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंडासाठी वापर करत असल्याचे तिने म्हटलंय.

काय म्हणाली बॉलीवुड अभिनेत्री?

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिलं ‘सोनम वांगचूप खऱ्या मुद्द्यावर लढत आहेत. हा लढा विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांच्या भविष्याचा आहे.सरकारने त्यांचं म्हणणं गांभीर्याने ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मला वाटतं. मी कॉकरोच जनता पार्टीशी मात्र अजिबात सहमत नाही. मला वाटतं की कॉकरोच जनता पार्टी सोनम वांगचुक यांचा वापर आपल्या राजकीय अजेंडासाठी करत आहे. याचं समर्थन मी करत नाही. माझा फक्त सोनम वांगचुक आणि त्यांच्या उद्दिष्टांना पाठिंबा आहे. कोण्या राजकीय संघटनेला नाही. आपले सर्वांचे कितीही राजकीय मतभेद असले तरी,देशासाठी आणि शिक्षणासाठी काम करणाऱ्या माणसाला गमावण्याचा धोका आपण पत्करू शकत नाही.सध्या सोनम वांगचुक यांची तब्येत लवकर बरी व्हावी, हे महत्त्वाचा आहे.त्यांचं म्हणणं ऐकून आवश्यक तो तोडगा काढला पाहिजे.असं या अभिनेत्रीने लिहिलं.

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरुन हटवून रुग्णालयात दाखल केलं (Sonam Wangchuk)

दिल्ली पोलिसांनी शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हलवून रुग्णालयात दाखल केलंय. यानंतर, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनी एक महत्त्वाचा दावा केलाय. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करुन सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी  मारहाण केली आणि त्यानंतर ताब्यात घेतलंय. गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी (18 जुलै) पहाटे आंदोलनस्थळावरून हलवले. त्यानंतर जंतरमंतरवरून CJP च्या कार्यकर्त्यांनाही हटवण्यात आलंय.

Bollywood Actress on Sonam Wangchuk: 'सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर'; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या कारवाईला तीव्र विरोध केलाय. आंदोलनस्थळी  आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय आणि या घटनेदरम्यान मोठी खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *